कल्याण , कुणाल म्हात्रे : दिवसेंदिवस पेट्रोल डीझेल आणि गॅसचे दर वाढत असून या इंधन दरवाढीचा युवक कॉंग्रेसच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून आज कल्याण जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने कल्याण डोंबिवली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनीष देसले यांच्या नेतृत्वाखाली कल्याण येथील पेट्रोल पंपावर भाववाढीचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी निषेध फलक लावून व पेट्रोल,डिझेल दरवाढीच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी कल्याण प विधानसभा उपाध्यक्ष फिरोझ शेख,जिल्हा सरचिटणीस प्रसन्न ताकपेरे, सरचिटणीस जाफर खाटीक,सरचिटणीस कपिल सुर्यांवशी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment