Header AD

भिवंडीत लाकूड वखारीस भीषण आग, लाकडा सह यंत्रसामुग्री जळून खाक

 



भिवंडी :दि१ (प्रतिनिधी  ) भिवंडी तालुक्यातील भिवंडी - कल्याण रस्त्यावरील गोवेगाव ग्रामपंचायत हद्दीत लाकडाच्या वखारी सह सॉ मिल कारखान्यास भीषण आग लागण्याची घटना पहाटे घडली आहे.उमिया सॉ मिल असे लाकडाच्या वखारीचे नाव असून, लाकडाची वखार बंद असताना पहाटेच्या सुमारास ही आग लागली कशी याचे कारण अस्पष्ट असले तरी आगीची माहिती मिळताच भिवंडी - कल्याण -डोंबिवली महानगरपालिका अग्निशामक दलाच्या प्रत्येकी एक गाडी घटनास्थळी दाखल होत खाजगी टँकर च्या मदतीने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करून तब्बल तीन तासांनी ही आग आटोक्यात आणली आहे .परंतु या आगीत लाखो रुपयांच्या लाकूड साठ्यासह लाकूड कटाईची यंत्रसामुग्री या आगीत जळून खाक झाली आहे .
भिवंडीत लाकूड वखारीस भीषण आग, लाकडा सह यंत्रसामुग्री जळून खाक भिवंडीत लाकूड वखारीस भीषण आग, लाकडा सह यंत्रसामुग्री जळून खाक Reviewed by News1 Marathi on March 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads