Header AD

कचरा वर्गी करणाच्या समस्येबाबत मनसेने घेतली उपायुक्तांची भेट


■मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांनी मांडली नागरिकांची कैफियत....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र. ३६ बैल बाजार प्रभागातील अनेक इमारतींना कचरा वर्गीकरणाची  समस्या भेडसावत असून याबाबत मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांनी पालिका उपायुक्त रामदास कोकरे यांची भेट घेत प्रभागातील नागरिकांना कचरा वर्गीकरणासाठी येत असलेल्या समस्यां मांडल्या. तसेच सोसायटीतून निघणारा कचरागटारफवारणी आणि अनधिकृत होर्डिंग्स बाबत चर्चा केली.


 महापालिकेने कचरा वेगळा करण्याची जवाबदारी सोसायट्यांना सोपविण्याची नोटीस काढली आहे.  त्यावर प्रत्येक सोसायटीला साठ ते सत्तर हजाराचा खर्च येणार आहे. सध्या कोरोना मुळे सर्वांची आर्थिक स्थिती खराब आहे. त्यात हा खर्च म्हणजे दुष्काळात तेरावा महिना यासारखे आहे. याबाबत रुपेश भोईर यांनी सोसायटीच्या पदाधिकारयांसमवेत उपायुक्तांची भेट घेऊन नागरिकांची कैफियत मांडली. उपायुक्त कोकरे यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्यावर योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.

कचरा वर्गी करणाच्या समस्येबाबत मनसेने घेतली उपायुक्तांची भेट  कचरा वर्गी करणाच्या समस्येबाबत मनसेने घेतली उपायुक्तांची भेट Reviewed by News1 Marathi on March 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads