Header AD

दहावीला “रेखाकला परीक्षांचे' चे गुण न देणे हा विद्यार्थ्यांवर अन्याय


■दहावीच्या विद्यार्थ्यांना रेखाकला गुणांपासून वंचित ठेऊ नये - भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभाग सरकारच्या निर्णयावर शिक्षक- पालकांचा संताप....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  राज्य सरकारने दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा शासकीय रेखाकला परीक्षेचे सवलतीचे अतिरिक्त गुण न देण्याचा निर्णय घेतला. शिक्षण मंडळाने या गुणांसाठी जानेवारी महिन्यातच प्रस्ताव मागवले होते आणि शाळांनीहि  जानेवारी महिन्यात  प्रस्ताव पाठवले आहेत.  सरकारने घेतलेला हा  निर्णय हजारो विद्यारथ्यांसाठी अन्यायकारक असल्याने कला शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.


चित्रकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरीइंटरसिजिएट उत्तीर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांना दहावीमध्ये श्रेणीनुसार अतिरिक्त वाढीव गुण दिले जातात: श्रेणीमध्ये ए श्रेणी सात गुणबी-पाचसी-तीन गुण असतात. कोरोनामुळे २०२०-२१ शैक्षणिक वर्षात परीक्षा घेण्यास मान्यता मिळाली नाही. या परीक्षा घेण्यात याव्यातअशी अनेक महिन्यांपासून शिक्षक मागणी करत होते. परंतु आता ही परीक्षा होणार नाही निश्‍चित झाले आहे. परंतु परीक्षा नाहीतत्यामुळें गुणही नाहीत असा निर्णय सरकारने घेतला आहे.


        कोवीडसंसर्गकोवीड प्रादुर्भाव व विद्यार्थी आरोग्याचा विचार करता  २०२०-२१ यावर्षी शासकीय रेखाकला परीक्षा न घेणेदृश्यकला पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षेत रेखाकला परीक्षेचे गुण गृहीत न धरणेएटीडी व फाऊंडेशन अभ्यासक्रमासाठी रेखाकला परीक्षा उत्तीर्णतेच्या अटीमध्ये सूट आणि २०२१-२२ यावर्षी पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी रेखाकला परीक्षा उत्तीर्णतेचा विचार न करणे याबाबतचा दि: २६ मार्च२०२१ रोजी  शासन निर्णय पारित केलेला आहे. हा योग्य निर्णय जरी असला तरी दुसरी कडे दहावीच्या परीक्षेत शासकीय रेखाकला परीक्षेचे सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येऊ नयेतअसे स्पष्ट केले. परंतु जे विद्यार्थी या परीक्षा आधीच उत्तीर्ण झाले त्यांच्यावर हा फार मोठा अन्याय असल्याचे भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागचे म्हणणे आहे.


           अनेक विद्यार्थी नववीपर्यंत दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होतात. त्यामुळे २०२०-२१ मध्ये परीक्षा झाली नाहीम्हणून गुणच न देणे कितपत योग्य आहे. जे विद्याथी २०१९-२० पर्यंत या ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्यावर हा अन्याय करण्यासारखे आहे.सवलतीच्या गुणांसाठीचे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश शिक्षण मंडळाकडून काढण्यात आले होते. शाळांनी जानेवारी महिन्यातच प्रस्ताव सादर केलेले आहेत. ऐनवेळी राज्य सरकारने सवलतीचे वाढीव गुण न देण्याचा निर्णय घेतला. जो विद्यार्थ्यांवर अन्याय कारक आहे. त्यामुळे विद्यार्थीपालकही संभ्रमात असल्याचे   गुरुनानक इंग्लिश हायस्कूलचे कला शिक्षक विनोद शेलकर यांनी सांगितले.


याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  उपमुख्यमंत्री अजित पवारशिक्षणमंत्री वर्षा गायकवाडशिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या सह शिक्षण सचिव यांना हि मेल द्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे. सरकार निश्चितच विद्यार्थी हिताचा निर्णय घेईल अशी आशा भाजप शिक्षक आघाडीच्या पदाधिकारी यांनी व्यक्त  केली आहे.


दहावीला “रेखाकला परीक्षांचे' चे गुण न देणे हा विद्यार्थ्यांवर अन्याय दहावीला “रेखाकला परीक्षांचे' चे गुण न देणे हा विद्यार्थ्यांवर अन्याय Reviewed by News1 Marathi on March 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads