Header AD

नेमबाजी करुन टिटवाळा येथे जागतिक महिला दिन साजरा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  सिद्धिविनायक युवा संस्था टिटवाळा यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी शिवसेना शाखाटिटवाळा येथे युवती व महिलांना मोफत नेमबाजी या ऑलिंपिक खेळाचे अद्यावत प्रशिक्षण देण्यात आले.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रीडा प्रशिक्षक विनायक कोळी यांच्याहस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या उपक्रमात टिटवाळाबनेलीआंबिवलीकल्याणठाकुर्ली तसेच डोंबिवली येथील ६५ पेक्षा अधिक युवती व महिला सहभागी झाल्या होते. क्रीडा प्रशिक्षक व राज्य युवा पुरस्कार विजेते विनायक कोळी सर तसेच क्रीडा प्रशिक्षक हरीष वायदंडे यांनी सर्व सहभागींना नेमबाजी या ऑलिंपिक खेळ प्रकाराविषयी व क्रीडा साहित्याच्या वापरासंदर्भात तांत्रिक माहिती दिली.


क्रीडा प्रशिक्षक संतोष मुंढे हर्षदा पाडेकरगौरी तिटमेआकांक्षा जाधव यांनी सर्व सहभागी युवती व महिलांना नेमबाजी करण्यासाठी सहकार्य केले. पहिल्यांदाच नेमबाजी करायला शिकल्यामुळे सर्व महिलांचा उत्साह द्विगुणित झाला होता. अशा स्वरूपाचे प्रशिक्षण टिटवाळ्यात नियमितपणे चालु व्हावे जेणेकरून ग्रामीण भागातुन अनेक युवक व युवती चांगले नेमबाज होतील अशी अपेक्षा देखील सर्व महिलांनी व्यक्त केली. सहभागी महिलांनी उस्फुर्तपणे प्रशिक्षण पूर्ण केले व सदर उपक्रमाविषयी सकारात्मक अभिप्राय नोंदवला.


          या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जयेश वाणीआनंद जाधव आणि राजेश एगडे आदी मान्यवर उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी किशोर शुक्ला यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

नेमबाजी करुन टिटवाळा येथे जागतिक महिला दिन साजरा  नेमबाजी करुन टिटवाळा येथे जागतिक महिला दिन साजरा Reviewed by News1 Marathi on March 08, 2021 Rating: 5

1 comment

  1. Happy women's day and greetings to all, like to thanks all VMAFZ team for making an awareness about self defense and fitness in women's (all age group), all the best for you up coming events.
    Regards.
    Surendra Salve.

    ReplyDelete

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads