Header AD

वडवली आणि शहाड उड्डाण पुलांच्या उद्घाटनाला पुन्हा विघ्न सोमवारी होणारे उद्घाटन काही दिवसाच्या प्रतीक्षेत
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : गेल्या १३ वर्षापासून नागरिकांना प्रतीक्षेत असणाऱ्या वडवली उड्डाणपुलाला मुहूर्त मिळाला खरा मात्र केवळ खासदार येत नसल्याने सोमवारी होणारा मुहूर्ताचा सोहळा महापालिकेला रद्द करण्यास भाग पडला असून याची मोठी चर्चा येथे रंगली आहे. राज्याचे नगर विकास मंत्री तथा पालकमंत्री यांच्या हस्ते वडवली आणि शहाड उड्डाण पुलांचा लोकार्पण सोहळा सोमवारी आयोजित केला होता, मात्र कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे अधिवेशनात व्यस्त असल्याने हा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला असल्याची चर्चा आहे.   वालधुनी नदी आणि वडवली सत्तेचाळीस गेटवर रखडलेल्या या पुलाचा उद्घाटनाच्या योग जुळून येत महापालिकेत सोमवारचा लोकार्पण करण्याचा निर्णयही निमंत्रण पत्रिका छापून व्यक्त केला असतानाच कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे  दिल्लीतील अधिवेशनास व्यस्त असल्याचे त्यांनी पालिका प्रशासनाला कळविल्याने नियोजित असलेल्या उद्घाटन सोहळा पुढे ढकलावा लागला असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे सचिव संजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता सांगितले. दरम्यान शहाड येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश कोट तसेच प्रभाग समितीचे माजी सभापती दयाशंकर शेट्टी यांची नावे देखील निमंत्रण पत्रिकेत नसल्याने सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफुस आहे.

वडवली आणि शहाड उड्डाण पुलांच्या उद्घाटनाला पुन्हा विघ्न सोमवारी होणारे उद्घाटन काही दिवसाच्या प्रतीक्षेत वडवली आणि शहाड उड्डाण पुलांच्या उद्घाटनाला पुन्हा विघ्न सोमवारी होणारे उद्घाटन काही दिवसाच्या प्रतीक्षेत Reviewed by News1 Marathi on March 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads