Header AD

डोंबिवली पूर्व - पश्चिम जोडणा-या कोपर उड्डाण पुलाच्या गर्डर लॉचिंगला सुरवात

 कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणा-या कोपर उड्डाण पुलाच्या गर्डर लॉचिंगचा शुभारंभ आज महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आला. तर केडीएमसी आयुक्तांच्या आधीच शिवेसना पदाधिकाऱ्यांनी नारळ फोडून आनंद व्यक्त केला. मात्रआयुक्तांच्या समोरच भाजप आमदारांनी कामात दिंरगाई झाल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे कल्याण डोंबिवलीचे राजकारण तापले आहे. 


कोपर उड्डाण पुल धोकादायक झाल्यामुळे १५  सप्टेंबर २०१९  पासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. हा पुल बंद असल्याने नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी कोविड-१९ च्या संचार बंदीच्या काळात रेल्वे सेवा बंद असताना उड्डाण पुल पुर्नबांधणीचे काम महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशाने तातडीने हाती घेण्यात आले आणि १७ एप्रिल रोजी रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली.


या उड्डाण पुलासाठी ७ गर्डर आज डोंबिवलीत दाखल झाले. राजाजी पथ येथे सुरु असलेल्या कोपर ब्रिजच्या दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक पासून राजाजी पथ पर्यंत ३ टप्प्यात ३ गर्डर चढविण्यात येणार आहेत. या कामासाठी वाहतूक कोंडी होवू नये म्हणून रामनगर ते राजाजी पथ मार्गे डोंबिवली पूर्वेकडे जाणा-या सर्व वाहनांना रामनगर रिक्क्षा स्टॅण्ड पर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आयरे गावआयरेरोडडोंबिवली पूर्व परिसरातही राजाजी पथ मार्गे रेल्वे स्टेशन रामनगर कडे येणा-या सर्व वाहनांना राजाजी पथ गल्ली क्र.१ च्या कडेला आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत/कोपर ब्रिज रेल्वे गर्डरचे काम होई पर्यंत प्रवेश बंद करण्यात आलेला आहे.


आज पहिल्या फेज मध्ये १५ मिटरचे ७ गर्डर टाकले जातील आणि पुढच्या फेज मध्ये १२ मिटरचे आणखी ७ गर्डर टाकले जातील आणि पुन्हा १८ मिटरचे ७ गर्डर टाकले जातीलअशी माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली. यापवेळी आमदार रविंद्र चव्हाणशहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली,कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा तसेच संबंधित कामाचे कंत्राटदार मे.पुष्पक रेल कन्स्ट्रक्शन प्रा.लि चे नविन वजरानी उपस्थित होते.

डोंबिवली पूर्व - पश्चिम जोडणा-या कोपर उड्डाण पुलाच्या गर्डर लॉचिंगला सुरवात डोंबिवली पूर्व - पश्चिम जोडणा-या कोपर उड्डाण पुलाच्या गर्डर लॉचिंगला सुरवात  Reviewed by News1 Marathi on March 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads