कल्याण डोंबिवली दर्शन बसच्या कामाला सुरवात महापालिका क्षेत्रातील पर्यटनस्थळे पाहण्याची नागरिकांना संधी
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली व आसपासच्या परिसरातील नयनरम्य पर्यटनस्थळे नागरिकांना पाहता यावी यासाठी मुंबईच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली दर्शन बस सेवा सुरु करण्यात येणार असून या बसच्या कामाला आज सुरवात करण्यात आली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांच्याहस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
कल्याण शहराची ऐतिहासिक नगरी तर डोंबिवली शहराची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख आहे. या शहरातील आणि आसपासची पर्यटनस्थळे एकाच दिवशी पाहता यावी यासाठी परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी मुंबईमध्ये ज्याप्रकारे दर रविवारी बस चालवली जाते त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली दर्शन बस सेवा सुरू करण्याची मागणी पालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याकडे केली होती. आयुक्तांनी हि मागणी मान्य केल्यामुळे या बसचे काम करण्याचा शुभारंभ आज गणेश घाट डेपो येथे पार पडला. यावेळी परिवहन सदस्य बंडू पाटील, अनिल पिंगळे आगार व्यवस्थापक संदिप भोसले साहेब व अधिकारी.कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment