Header AD

‘डॉलिवूड प्ले’द्वारे मनोरंजक चित्रपटांच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा
मुंबई, १ मार्च २०२१ : भारतातील पहिला व एकमेव समर्पित हिंदी डब ओटीटी प्लॅटफॉर्म ‘डॉलिवूड प्ले’ ने हिंदी चित्रपट प्रेमींसाठी २४ नव्या मास एंटरटेनमेंट चित्रपटांच्या डिजिटल प्रीमिअरची घोषणा केली. प्लॅटफॉर्मच्या ‘लाँच कँपेन’चा भाग म्हणून एका वर्षात हे चित्रपट प्रदर्शित केले जातील. विविध लोकप्रिय प्रवाहांतील हिंदीत डब केलेल्या चित्रपटांच्या रसिकांची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाईल. ही कल्पना पूर्ण करताना, डिव्हाइस- अॅग्नोस्टिक प्लॅटफॉर्मने सहा प्रीमिअर्सची यादी दिली असून ती लवकरच प्लॅटफॉर्मवर दाखवली जाईल. त्याची सुरुवात ‘विकिंग लडाकू चित्रपटाने होईल.”


अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच प्रादेशिक पातळीवर अखंड मनोरंजन पुरवण्यासाठी हा ओटीटी प्लॅटफॉर्म वचनबद्ध आहे. त्यानुसारच ही नवी घोषणा करण्यात आली आहे. डॉलिवूड प्लेवर सध्या ‘विकिंग लडाकू’ हा अॅक्शन अॅडव्हेंचर दाखवला जात असून त्यानंतर ५ डिजिटल प्रीमिअर्सची मालिका सुरू होईल. (१५ दिवसांत एक). ‘मै इंतेकाम लूंगी’, ‘कातील जलपरी’, ‘ग्रुपी’, ‘कातील तलवार’ आणि ‘हसीना और जानवर’ या चित्रपटांचा त्यात समावेश आहे.


दक्षिण भारतीय आणि जागतिक सिनेमा हिंदीमध्ये डब करण्याची गरज डॉलिवूड प्ले भरून काढत आहे. त्यामुळेच अत्यंत आकर्षक आणि किफायतशीर सबक्रिप्शन प्लॅनद्वारे यूझर्सला हे मनोरंजन पुरवले जात आहे. ग्राहकांना सर्वोत्कृष्ट मास एंटरटेनमेंटची मेजवानी देतानाच, या डिजिटल प्लॅटफॉर्मने अॅक्शन, अॅडव्हेंचर, क्रिएचर, थ्रिलर, हॉलर, कॉमेडी, रोमान्स, ड्रामा इत्यादी विविध प्रवाहांतील कंटेंट हिंदी भाषेत स्ट्रीम केला आहे.


डॉलिवूड प्लेचे संस्थापक-संचालक अनीष देव म्हणाले, “ सर्वाधिक निवडक व पसंतीचा मास एंटरटेनमेंट कंटेंट आमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या ग्राहकांना दक्षिण भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय चित्रपटांची उणीव भासू नये म्हणून आम्ही भाषेचा अडथळाच दूर करु इच्छितो. आम्ही पहिल्या २४ चित्रपट मालिकेची सुरुवात केली असून ग्राहकांच्या मागणीनुसार आणखी कंटेंट आम्ही समाविष्ट करत राहणार आहोत."‘डॉलिवूड प्ले’द्वारे मनोरंजक चित्रपटांच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा ‘डॉलिवूड प्ले’द्वारे मनोरंजक चित्रपटांच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा Reviewed by News1 Marathi on March 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads