Header AD

कल्याण पूर्वेतील चौरे कुटुंबावर काळाचा घाला अपघातात कुटुंबातील ४ पैकी ३ सदस्यांचा मृत्यू
कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  एका लग्न सोहळ्यासाठी ४ चाकी वाहनातून जळगांवकडे जाणाऱ्या कल्याण पूर्वेतील एकाच कुटुंबातील ४ पैकी ३ सदस्यांचाजणाचा अपघाती मृत्यु झाला आहे. गुरुवारी दुपारी मुंबई आग्रा महामार्गावर झालेल्या या अपघातात पोलिस खात्यात नोकरीला असलेले पंडित चौरे यांची पत्नीमुलगा आणि मुलगी असे ३ जण मृत्युमुखी पडल्याने चौरे कुटुंबावर काळाने घाला घातला असून या दुदैवी घटनेने कल्याण पूर्वेतील विजय नगर परिसरात शोककळा पसरली आहे. तर या अपघातात पोलिस कर्मचारी पंडीत चौरे आणि वाहन चालक ही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


मुंबई आग्रा महामार्गावरील कोकणगांव फाट्याजवळ हा अपघात झाला. कल्याणहून जळगावकडे निघालेल्या चौरे कुटूंबियांचे चार चाकी वाहन रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका सिंमेटच्या ट्रक वर आदळले याच दरम्यान मागून येणाऱ्या बस चालकाचेही बसवरचे नियंत्रण सुटल्याने या बसनेही या चार चाकी वाहनाला मागून जोरात धडक दिली. या तिन वाहनांच्या विचित्र अशा अपघातात चारचाकी मध्ये असलेल्या १९ वर्षीय मयुरी चौरे या युवतीचे जागीच निधन झाले तर पंडीत चौरे यांच्या पत्नी वैशाली चौरे आणि २२ वर्षाचा मुलागा सागर चौरे यांचे उपचारादरम्यान निधन झाले.


सागर हा कळव्याला एका खाजगी कंपनीत इंजिनीअरिंगचा जॉब करत होता तर मयुरी चौरे ही नुतन ज्ञान मंदिर शाळेची माजी विद्यार्थिनी असून ती सध्या पेंढारकर कॉलेज मध्ये १२ वीचे शिक्षण घेत होती. पंडीत चौरे यांचे हे कुटूंब बहीणीच्या मुलाच्या लग्नासाठी जळगाकडे चालले होते. शुक्रवारी हळद तर रविवारी लग्न होते. परंतु या कुटूंबीयावर लग्न स्थळी पोहचण्या पूर्वीच नियतीने घाला घातल्याने कल्याण पूर्व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कल्याण पूर्वेतील चौरे कुटुंबावर काळाचा घाला अपघातात कुटुंबातील ४ पैकी ३ सदस्यांचा मृत्यू कल्याण पूर्वेतील चौरे कुटुंबावर काळाचा घाला अपघातात कुटुंबातील ४ पैकी ३ सदस्यांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on March 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads