Header AD

अनियमित वीज पुरवठया मुळे खराब झालेल्या वस्तू शिवसेना पदाधि काऱ्याने महावितरणचा कर्मचाऱ्यांना दिल्या भेट


■टिटवाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण....


कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : अनियमित वीज पुरवठयामुळे खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू शिवसेना पदाधिकाऱ्याने महावितरणच्या  कर्मचाऱ्यांना भेट दिल्या असून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने टिटवाळ्यातील नागरिक यामुळे पुरते हैराण झाले आहेत.  


टिटवाळ्यामध्ये काही दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. गेल्या १७ मार्चला ट्रान्सफार्मर  बिघडल्याने आर के नगर परिसरात जवळपास ४० तास बत्ती गुल होती. आता पुन्हा २९ तारखेला ट्रान्सफर्मार बिघडल्याने लाईट गेली आहे. याचदरम्यान काही घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू उडाल्या. यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच लॉकडाऊनमुळे नागरिकांची आर्थिक स्थिती कोलमडली असतांना महावितरण जबरदस्तीने नागरिकांकडून वीजबिल वसूल करत आहे. त्यातच अनेकवेळा लाईट जात असल्याने वाढत्या उन्हाळ्यात नागरिक हैराण झाले आहेत. हे सर्व कमी होते कि काय म्हणून २९ तारखेला ट्रान्सफार्मर उडाल्याने अनेक नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील उडाल्या आहेत.  


या सर्वांचा जाब विचारण्यासाठी टिटवाळ्यातील शिवसेना पदाधिकारी विजय देशेकर यांनी काही उडालेल्या वस्तू ज्यामध्ये एसीइन्व्हर्टरटीव्ही आणि मिक्सर आदींचा समावेश आहे. या वस्तू टिटवाळा येथील महावितरण कार्यलयात जाऊन कर्मचाऱ्यांना भेट  दिल्या. एवढेच नाही तर कार्यालयात नेहमी गैरहजर राहणारे अधिकारी धीरज कुमार धुवे यांच्या खुर्चीला शाल घालून त्यांचा प्रतिकात्मक सन्मान केला.

अनियमित वीज पुरवठया मुळे खराब झालेल्या वस्तू शिवसेना पदाधि काऱ्याने महावितरणचा कर्मचाऱ्यांना दिल्या भेट अनियमित वीज पुरवठया मुळे खराब झालेल्या वस्तू शिवसेना पदाधि काऱ्याने महावितरणचा कर्मचाऱ्यांना दिल्या भेट Reviewed by News1 Marathi on March 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads