Header AD

भिवंडी तालुक्या तील ग्रामीण भागात कोव्हिड लसीकरणाला सुरुवात


भिवंडी :दि.११ (प्रतिनिधी  )कोव्हिडं लसीकरणा बाबत शासन स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू असून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून भिवंडी तालुक्यातील खारबाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकताच याचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या महिला व बालकल्याण समिती माजी सभापती सपना राजेंद्र भोईर यांनी सर्वप्रथम लस घेऊन शुभारंभ पंचायत समिती सभापती ललित प्रताप पाटील राहनाळ ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र भोईर, भाजपा जिल्हा चिटणीस राजेंद्र भोईर ,वसंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला .


          सर्वाना कोव्हिडं लसीचा प्रतीक्षा असताना सुरवातीच्या टप्प्यात आरोग्य विभाग व त्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण केल्या नंतर सर्वसामान्य वृद्ध व व्याधीग्रस्त यांच्या साठी लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.बुधवारी या लसीकरणास प्रारंभ केल्या नंतर केंद्रांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रातील ६०वर्ष वरील वयोवृद्ध व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त यांना याचा लाभ घेता येईल अशी माहिती खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ बाळासाहेब डावखर यांनी दिली आहे .


या लसीकरणाच्या शुभरंभाचे औचित्य साधत प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स,परिचारिका ,अंगणवाडी सेविका याना कोव्हिडं योद्धा म्हणून सन्मानपत्र देत गौरव करण्यात आला .
भिवंडी तालुक्या तील ग्रामीण भागात कोव्हिड लसीकरणाला सुरुवात भिवंडी तालुक्या तील ग्रामीण भागात कोव्हिड लसीकरणाला सुरुवात Reviewed by News1 Marathi on March 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पीडीतेला व तिच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची रिपाईच्या वाहतूक आघाडीची मागणी

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना घडली असून या प्रकरणातील दोषी...

Post AD

home ads