Header AD

पॉज संस्थेचा महाशिवरात्री दिनानिमित्त अनोखा उपक्रम
डोंबिवली ( शंकर जाधव) पॉज संस्था डोंबिवली वतीने दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्र दिनानिमित्त अनोखा उपक्रम राबविला जातो.शिवशंकराच्या पिंडीवर शिवभक्त शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करतात.यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मंदिरे बंद असल्याने पॉज संस्थेचे कार्यकर्ते अभिषेक सिंग,साधना सभरकर,उनिशिया वाझ,पवन भोईटे आणि ग्लेन अलमेडा यांनी भाविकांशी संवाद साधून संस्थेला दुध देण्याची विनंती केली.


या उपक्रमास नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला असून काही तासात सुमारे ८० लिटर दुध संस्थेकडे जमा झाल्याची माहिती संस्थेचे निलेश भणगे यांनी दिली.वीस लिटर दुध हे साईसेवा वृधाश्रमला दिले. भाविकांकडून जमा झालेले दुध एकत्र करून त्यात पाणी मिळवून फिल्टर करून पोज संस्था रस्त्यावरील जखमी प्राण्यांना देते. तसेच न फोडलेल्या दुधाच्या पिशव्या हे वृद्धाश्रमात आणि अनाथालयात दिले.

पॉज संस्थेचा महाशिवरात्री दिनानिमित्त अनोखा उपक्रम  पॉज संस्थेचा महाशिवरात्री दिनानिमित्त अनोखा उपक्रम Reviewed by News1 Marathi on March 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads