मराठी भाषेचे अनोखे दर्शन मांडणारे चित्रकार श्री किशर श्रीधर बाविस्कर यांचा विश्वविक्रम
ठाणे, प्रतिनिधी , ठाणे येथील शिव समर्थ माध्यमिक विद्यालयातील कलाशिक्षक श्री किशोर श्रीधर बाविस्कर यांनी दिनांक 27 2 2021रोजी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून आपल्या कलागुणांना तून विविध मराठी देवनागरी अक्षरांचा वापर करून चित्रकलेच्या अमूर्त शैली सकाळी 11 ते 4 या वेळेत 200 कलाकृती निर्माण केल्या भारत वर रेकॉर्ड करून विश्वविक्रम करण्याचा मान श्री किशोर बाविस्कर सरांचा नावावर नोंदवला आहे.
श्री किशोर बाविस्कर हे कलाशिक्षक आहेतच परंतु एक प्रतिभावंत चित्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे ते मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील गोरगावले बुद्रुक येथील रहिवासी आहेत नोकरीनिमित्त ते ठाणे येथील शिव समर्थ माध्यमिक विद्यालयात 26 वर्षापासून कलाशिक्षक पदावर कार्यरत आहेत .
आपल्या कलेतून समाजासाठी सरांनी कोरणा आपत्ती काळात कलाकृती विकून गरजू लोकांना आर्थिक मदत केली सरांचे सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे यासाठी त्यांची दखल जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी या महासंघाने घेतली महाराष्ट्र दर्पण सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गौरवण्यात आले.
तसेच महात्मा गांधी दर्शन पुरस्कार महाराष्ट्र दीपस्तंभ सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे शैक्षणिक क्षेत्रात त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे दर वर्षी ठाणे महानगर पालिका तर्फे घेण्यात आलेल्या भीती चित्र व चित्रकला स्पर्धेत त्यांची तज्ञ मार्गदर्शक म्हणून नेमणूक करण्यात येते तसेच राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्काराने करण्यात आले आहे.
गौरविण्यात आले आहे व राज्यस्तरीय कलातपस्वी पुरस्काराने 2005 या वर्षी गौरवण्यात आले आहे या कार्यक्रम प्रसंगी निसर्ग चित्रकार भागवत सर श्री अमोल प्रभा अमोल प्रभाकर अंबोंकर पी एस आय श्री सुनील चव्हाण पीएसआय अरुण राजपूत ,प्रताप सोनवणे सौ रंजना साळुंके सौ नंदिनी बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment