Header AD

टिटवाळा महावितरण कार्यालया जवळ शेकडोंचा जमाव कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  टिटवाळा येथील वीजग्राहकांना येथे नेमणुकीस दिलेल्या रीडिंग कर्मचाऱ्यांकडून अव्वाचा सव्वा विद्युत बिल दिल्याने येथील कार्यालयावर शेकडो ग्राहकांनी शंका आणि समाधान करून घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. याबाबत टिटवाळ्यातील महावितरण कार्यालयात करोनाचा  संसर्ग होणार नाही का असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे.


शुक्रवारी महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शेकडो ग्राहक कार्यालयावर गेले होते. रीडिंग घेत असणार्‍या कर्मचाऱ्यांमुळे मोठ्या फरकाचे विद्युत बिल ग्राहकांना देण्यात आल्याने रखरखत्या उन्हात कोरोनाचीही पर्वा न करता शेकडो ग्राहकांनी याबाबत कार्यालयात जमा झाल्याचे दिसून आले. एकीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कोरोना संदर्भात निर्बंध जारी केले असतानाच येथे मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. सोशल डिस्टनचा पुरता फज्जा उडला असल्याचे चित्र दिसत होते.


    महावितरणाच्या विरोधात तक्रार घेऊन आलेल्या या नागरिकांनी करोना महामारीत शेकडोने गर्दी  जमविल्याने महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी टिटवाळा येथील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष कल्याण तालुका प्रमुख  विजय देशेकर यांनी केली आहे. जर विवाह सोहळा व घरगुती कार्यक्रमांवर गुन्हे दाखल होतात तर मग विद्युत मंडळाच्या अधिकार्‍यांवर गुन्हा का दाखल होऊ शकत नाही असा सवाल देखील विजय देशेकर यांनी केला आहे. यासंदर्भात टिटवाळा महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता धुर्वे यांना यासंदर्भात भ्रमण ध्वनी वरून संपर्क साधला असता संपर्क झाला नाही.


टिटवाळा महावितरण कार्यालया जवळ शेकडोंचा जमाव कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी टिटवाळा महावितरण कार्यालया जवळ शेकडोंचा जमाव कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी Reviewed by News1 Marathi on March 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads