Header AD

आजच्या युगातील छद्म विज्ञान या विषयावर डॉ. अनिकेत सुळेंचे मार्गदर्शन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उपक्रम
कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  : अंधश्रद्धा निर्मूलनवैज्ञानिक दृष्टीकोणाचा प्रसार-प्रचार आणि व्यापक सामाजिक परिवर्तनासाठी काम करणार्‍या महा अंनिसच्या कल्याण शाखेतर्फे 'विज्ञान दिन २०२१'चे आयोजन रविवारी सायंकाळी फेसबुकवर ऑनलाइन स्वरुपात करण्यात आले. वर्तमान कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाइन स्वरुपात शाखेच्या 'डॉ नरेंद्र दाभोळकर प्रेमीठाणेया फेसबुक पेजवरून प्रसारित करण्यात आला. 


कार्यक्रमाची सुरुवात कल्याण शाखेचे कार्याध्यक्ष राजेश देवरुखकर यांच्या प्रस्तावनेने झाली. त्यांनीच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रमुख वक्ते वैज्ञानिक प्रा. डॉ. अनिकेत सुळे (सहयोगी प्राध्यापकहोमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रमुंबई) यांचा परिचय महा अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष गौतम जाधव यांनी करून दिला. 


प्रा. डॉ. अनिकेत सुळे यांनी 'आजच्या युगातील छद्म विज्ञान  या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. छद्म विज्ञान या विषयाची व्याख्या सोपी करून सांगताना डॉ. सुळे यांनी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या व्याख्यानांचे संदर्भ दिले. वैज्ञानिक पद्धतीवैज्ञानिक दृष्टीकोनश्रद्धा इत्यादि विषयांची सरमिसळ करून जे गोंधळ माजविले जात आहेत याची अनेक उदाहरणे देऊन त्यांनी विषय स्पष्ट करून सांगितला. तसेच गेल्या काही काळात केल्या गेलेल्या अनेक छद्म-विज्ञान-आधारित हास्यास्पद दाव्यांचा त्यांनी तार्किकपणे आणि वैज्ञानिक आधारावर समाचार घेतला.


 त्यांच्या व्याख्यानानंतर आरती हाटकर या कार्यकर्तीने उपस्थितांमधून आलेले प्रश्न वाचून दाखविले ज्यांना डॉ. सुळे यांनी समर्पक उत्तरे दिली. तानाजी सत्वधीर यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह वर अनेक प्रेक्षकांनी पाहिला.

आजच्या युगातील छद्म विज्ञान या विषयावर डॉ. अनिकेत सुळेंचे मार्गदर्शन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उपक्रम आजच्या युगातील छद्म विज्ञान या विषयावर डॉ. अनिकेत सुळेंचे मार्गदर्शन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उपक्रम  Reviewed by News1 Marathi on March 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads