Header AD

भिवंडीत दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना वस्तीगृहास अचानक लागली आग, अडकलेल्या 74 विद्यार्थी सुखरूप बाहेर काढले..

भिवंडी दि 30  (प्रतिनिधी ) मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत अहंरम लॉजिस्टिक कॉम्प्लेक्स  जवळील  इमारतीमध्ये ईडीयु लाईट या संस्थेचे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य केंद्र असून यामध्ये  अचानक आग लागली .पाहता पाहता दुसऱ्या मजल्यावरील वसतिगृह इमारतीत धूर पसरल्याने विद्यार्थ्यांनी टेरेस चा आसरा घेतला त्यानंतर आलेल्या भिवंडी अग्निशामक दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास स्थानिकांच्या मदतीने प्रयत्न केला .या वसतिगृहात सध्या 74 प्रशिक्षणार्थी असून त्यापैकी 30 मुली असून हे सर्व प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या जिल्ह्या तील असून त्यांना या ठिकाणी कॉल सेंटर एक्झिकेटीव्ह व डाटा इन्ट्री चे तीन महिन्याचे प्रशिक्षण दिले जात आहे .


या आगीचे करण अजून स्पष्ट नसले तरी शॉर्ट सर्किट ने आग लागल्याचे बोलले जात असून ,अग्निशामक दलाच्या भिवंडी जवानांनी या सर्व प्रशिक्षणार्थींची सुखरूप सुटका स्थानिकांच्या मदतीने केली परंतु या आगीत सर्व प्रशिक्षणार्थींचे कपडे अत्यावश्यक साहित्य या आगीत पूर्ण जाळून खाक झाले आहे . स्थानिकांनी या सुटका केलेल्या सर्वाना नजीकच्या अरहम लॉजेस्टिक कार्यालयात बसविल्या नंतर रात्री त्यांच्या जेवण व राहण्याची व्यवस्था स्थानिकांच्या मदतीने नजीकच्याच प्रेसिडेन्सी स्कुल या ठिकाणी पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके यांनी केली आहे.
भिवंडीत दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना वस्तीगृहास अचानक लागली आग, अडकलेल्या 74 विद्यार्थी सुखरूप बाहेर काढले.. भिवंडीत  दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना वस्तीगृहास अचानक लागली आग, अडकलेल्या  74 विद्यार्थी सुखरूप बाहेर काढले.. Reviewed by News1 Marathi on March 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads