भिवंडीत चारशे रक्त दात्यांनी केले रक्तदान ..
भिवंडी : दि.२१ (प्रतिनिधी ) मागील वर्षी कोरोना काळात रक्तदाना कडे अनेकांनी पाठ फिरवल्याने अनेक गराजवंतांना वेळेवर रक्तपुरवठा होऊ शकला नसतानाच शासकीय पातळी वर रक्तदान करण्या बाबत आवाहन केले जात असताना भिवंडी शहरात जमायते - ए - इस्लामी या संस्थेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल ४०० दात्यांनी रक्तदान केले आहे .जमायते - ए - इस्लामी या संस्थे तर्फे मागील नऊ वर्षां पासून रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असून ज्या माध्यमातून आता पर्यंत तब्बल १५ शे रक्त बाटल्यांचा संकलन केले असल्याची माहिती आयोजक मौलाना औसाफ फलाही यांनी दिली आहे.
जमायते - ए - इस्लामी या संस्थे सोबत फलाह - ए -ट्रस्ट ,स्टूडेंट इस्लामिक ऑर्गनायझेशन व जी एम मोमीन गर्ल्स कॉलेज एन एस एस विभाग यांच्या सहकार्यातून झालेल्या या रक्तदान शिबिरात मसिना रक्तपेढी मुंबई,
संकल्प रक्तपेढी कल्याण व भिवंडी रक्तपेढी भिवंडी या तीन रक्तपेठ्यांनी रक्त संकलनात सहकार्य केले .ज्या मुळे सकाळ पासून सुरू असलेल्या या रक्तदान शिबिरात तब्बल ४०० रक्तदात्यांनी रक्तदान केले या मध्ये महिलांचा समावेश सुद्धा लक्षणीय होता .तर हा भव्य रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मौलाना औसाफ फलाही यांसह डॉ.निसार मुक्री, डॉ.इंतेखाब आलम,
तंजिम अन्सारी,मोहम्मद अली,डॉ बशीर अल्वि यांसह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली .
भिवंडीत चारशे रक्त दात्यांनी केले रक्तदान ..
Reviewed by News1 Marathi
on
February 21, 2021
Rating:

Post a Comment