Header AD

कल्याण पश्चिमे कडील डी मार्टमध्ये खरेदी साठी उसळली गर्दी..

 



डोंबिवली ( शंकर जाधव) कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतान नागरिकांनी खरेदीसाठी कल्याण पश्चिमेतील डी मार्टमध्ये गर्दी केल्याने सामाजिक अंतराचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. डी मार्टमध्ये ग्राहकांची गर्दीझाल्याची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिसांनी डी मार्ट व्यवस्थापनाच्या विरोधात कारवाई केली होती. पुन्हा दोन दिवसांनी सायंकाळी नागरीकांनी खरेदीसाठी डी मार्टमध्ये गर्दी केली होती.  

    

      खरेदीसाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरीकांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले कीकोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो अशी सगळीकडे चर्चा आहे. लॉकडाऊन लागू झाल्यावर खरेदी कुठून करणार ? सोशल डिस्टसींगचा फज्जा उडाल्याने डी मार्टच्या विरोधात दहा हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई केली जाणार आहे. या उपरही त्यानी नियमांचे पालन केले नाही तर डी मार्ट सील करण्याची कारवाईही केली जाऊ शकते अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.


कल्याण पश्चिमे कडील डी मार्टमध्ये खरेदी साठी उसळली गर्दी.. कल्याण पश्चिमे कडील डी मार्टमध्ये खरेदी साठी उसळली गर्दी.. Reviewed by News1 Marathi on February 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कोविड सेंटर मध्ये विनय भंग झालेल्या महिलेच्या उपचा राकडे दुर्लक्ष

■ उपचारासाठी महिलेला खाजगी रुग्णालयात हलविले... कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दोन दिवसांपूर्वी कल्याणमधील लालचौकी येथील केडीएमसीच्या आर्ट गॅ...

Post AD

home ads