Header AD

डोंबिवलीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार पक्ष सोडणाऱ्यांवर करणार टीका ?


डोंबिवली , शंकर जाधव : मनसे पक्षाने महाराष्ट्रात वेगळाच ठसा उमटविल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणावर टीका करणार ? याकडे अनेक पक्षांचे लक्ष असते.मात्र मनसे पक्षाला राम राम करून आजवर अनेकांनी शिवसेना –भाजप पक्षात प्रवेश केला.तरीही पक्षाचे काम सुरूच राहिले. नुकतेच मनसेतून राजेश कदम आणि मंदार हळबे यांनी सोडचिठ्ठी दिली.पक्ष सोडण्यामागील नेमके काय कारण आहे हे मनसैनिकांचा नव्हे तर इतर पक्षांमध्ये याची चर्चा रंगली.पण ज्यांनी ज्यांनी पक्ष सोडला त्यांच्याबद्दल राज ठाकरे यांनी अगदी थोडक्यात शब्दात टीका केली होती.


पालिका निवडणुका जवळ आल्याने शहरात पक्षांमध्ये आयाराम –गयाराम होत असते. मात्र मनसेतून शिवसेनेत गेलेल्यांना पक्षातील पदाधिकाऱ्या सोशल मोडीयातून जोरदार टीका केली आहे.आता मनसेचा निष्ठावंत कार्यकर्ता मनोज घरत यांच्या गळ्यात पुन्हा डोंबिवली शहरअध्यक्षाची माल घातल्याने खर्या अर्थात आता पक्षाला आणखीच बळकटी येणार असल्याचे बोलले जात आहे. फेब्रेवारी महिन्यात मनसेचे डोंबिवलीत मध्यवर्ती कार्यालय सुरु होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच्या हस्ते या कार्यालयाच्या उद्घाटन होणार आहे. यावेळी राज ठाकरे हे पक्ष सोडणाऱ्यांवर कोणती टीका करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


राम कदम, वसंत गीते, नितीन नांदगावकर, प्रवीण दरेकर यांनी पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केला. राम कदम यांनी पक्ष सोडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी `गद्दारांना माफी नाही`असे जाहीर सभेत सांगितले होते.डोंबिवलीत मनसेचा आवाज म्हणून ओळखले जाणारे राजेश कदम यांनी शिवसेनेवर आजवर इतकी टीका केली कि शिवसेनेला चीड यायची. पण टीकेला उत्तर टीका असे असल्याने शिवसेनेनेही तसेच उत्तर दिले होते.मात्र काही दिवस राजेश कदम यांनी सोशल मिडीयात शिवसेनेवर टीका करणे टाळले होते मनसे नेते तथा आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांचेही सोशल मिडीयावरील राजेश कदम याच्या लिखाणावर लक्ष ठेऊन होते. पक्ष सोडण्याच्या दोन-तीन दिवसाअगोदर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राजेश कदम यांनी भेट घेतली होती.परंतु आपल्या मनातले बोलणे कदम राज ठाकरे यांना सांगू शकले नाहीत.


इतकी वर्ष ज्या पक्षावर टीका केली त्या पक्षावर अचानक इतके प्रेम आणि आपुलकीकदम यांना कशी आली याचे सर्वानाच आश्चर्य वाटत आहे.कदम यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसे पक्षाचा डोंबिवलीत आवाज बंद होईल का असा प्रश्न सर्वाना पडला आहे.परंतू मनोज घरत यांची डोंबिवली शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती केल्याने मनसेचा तोच आवाज कायम राहणार असे राज ठाकरे यांनी डोंबिवलीकरांना दाखवून दिले. फेब्रेवारी महिन्यात डोंबिवलीत मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज ठाकरे पक्ष सोडणाऱ्यांवर टीका करणार का ? अशी माणसे पक्ष सोडून गेल्याने पक्षाला काहीही फरक पडणार नाही असे दाखवत त्यांच्याबद्दल बोलणे टाळतील हे त्यावेळी दिसून येईल.  

डोंबिवलीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार पक्ष सोडणाऱ्यांवर करणार टीका ? डोंबिवलीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार पक्ष सोडणाऱ्यांवर करणार टीका ? Reviewed by News1 Marathi on February 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads