Header AD

महिना भरात वॉर रेस्क्यू फाउंडेशनने दिले १५० हून अधिक सापांना जीवनदान

  कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  सध्या वातावरण बदलामुळे अनेक श्वापद बाहेर येत असून गेल्या महिनाभरात वॉर रेस्क्यू फाउंडेशनने कल्याण डोंबिवली, टिटवाळा परिसरातून सुमारे १५० हून अधिक सापांना पकडून जीवनदान दिले आहे.


      टिटवाळाच्या इंदिरा नगर परिसरातील रहिवासी अनिल यांच्या घरात साप शिरल्याची माहिती नागरिकांनी दिली संस्थेला दिली. वॉर रेस्क्यू टिमचे स्वयंसेवक विशाल सोनावणे व क्षितिज जाधव यांनी तात्काळ दखल घेत सदर ठिकाणी  बाल्कनीत लपवून बसलेल्या धूळ नागीण जातीच्या सापाला सुरक्षित बचाव करून वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली निसर्गमुक्त केले. तर दुसर्‍या घटनेत गणपती मंदिर परिसरात घोणस जातीचे सापाचे पिल्लू आढळून आले त्याचा बचाव चेतन चव्हाण आणि सागर म्हात्रे या वॉर टिमच्या स्वयंसेवकानी केला. धूळ नागीण हा साप  मातीत आढळणारा बिनविषारी साप आहे याचे प्रमुख अन्न हे छोटे उभयचर व पक्षी व त्यांची अंडी हे आहेत.


        गेल्या महिन्याभरात कल्याणडोंबिवलीटिटवाळा परिसरातून १५० हून अधिक सापांना वाचविण्यात वॉर रेस्क्यू फाउंडेशनच्या स्वयंसेवकांना यश आले आहे. या सर्व नोंदीमध्ये धुळ नागिण जातीची नोंद ऊल्लेखनीय असल्याची माहीत वॉर रेस्क्यू फाउंडेशनचे टिटवाळा सदस्य  स्वप्निल कांबळे यांनी दिली.

महिना भरात वॉर रेस्क्यू फाउंडेशनने दिले १५० हून अधिक सापांना जीवनदान महिना भरात वॉर रेस्क्यू फाउंडेशनने दिले १५० हून अधिक सापांना जीवनदान Reviewed by News1 Marathi on February 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads