Header AD

संत रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२१ जाहीर जयंती निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन

 

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : संत रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२१ ची कार्यकारणी जाहीर झाली असून अध्यक्ष पदी  गजानन लिंबोंरे यांची निवड करण्यात आली आहे.संत रविदास यांचा जन्म सुमारे इ.स. १४५० मध्ये झाला असावा असे म्हणतात. भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात. ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते. तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते. त्यांच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत.अशा या संत रविदास महाराज यांची जयंती कल्याण आणि उल्हासनगर शहराच्या वतीने एकत्रित साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त संत रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने उल्हासनगरच्या टाऊन हॉल येथे ७ मार्च रोजी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


यासमितीच्या उपाध्यक्षपदी  पितांबर शिंदे, विलास भोळे, सचिवपदी रमेश मिमरोट, उपसचिव उषा परमेश्वरे, भिकन जाधव, खजिनदार आकाश सोनवणे, उपखजिनदार रोहित गमलाडु, सल्लागार हेमदास सोनबरसे, गजानन गवळी, व्यवस्थापक गोरेख शेवाळे, माया रिसवाल, ललित तावडे, प्रसिद्धीप्रमुख पंकज डोईफोडेराजु सोनवणे, कार्यकारणी सदस्य विजय पवार, रोहिदास पगारे, पांडुरंग चाबुकस्वारजितु पुरभे, भास्कर पवार, अमय गमलाडु कुणाल सावकारे आदींची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्धीप्रमुख पंकज डोईफोडे यांनी दिली. 


संत रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२१ जाहीर जयंती निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन संत रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२१ जाहीर जयंती निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन  Reviewed by News1 Marathi on February 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads