Header AD

राष्ट्रीय दर्जा आर्टिस्ट शैलेश कांबळे याच निराश जनक वक्तव्य
मुंबई,  प्रतिनिधी  :  मराठी- हिंदी वाद्यवृंद क्षेत्रात काम  करणारे सर्व कलाकार व तंत्रज्ञ याचा उदरनिर्वाह करमणुकीच्या कार्यक्रमावर अवलंबून असतो. कोरोनाच्या काळात सर्व गोष्टी बंद होत्या त्याच प्रमाणे सांस्कृतिक क्षेत्र ही पूर्ण पणे बंद होते.


कोरोना काळात कलाविश्व संपूर्ण थंडावले. यामुळे लोककला, गायन, वादन, नृत्य इत्यादी कला क्षेत्रात काम करणारे कलाकार ,तंत्रज्ञ यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.याची सरकारला जाणिव आहे परंतु आता कलावंतांची सहन करण्याची ताकद संपली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे लाॅकडाऊन व अनलाॅक काळात ह्या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे.


काही कलाकारांनी या दहा महिन्याच्या काळात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? काय करायचे? हाताला काही काम नाही आहे.या सर्व गोष्टींचा विचार करून टेन्शन घेऊन मुंबई व उपनगरातील तब्बल 15 ते 20 कलाकारांना हृदयविकार झटक्याने मृत्यू झाले आहेत. कोरोना बाबत असणाऱ्या  अटी नियम याचं पालन कलाकार नक्की करतील त्याची अंमलबजावणी करतीलच. अशी परिस्थिती असताना 1 मार्च ला पुन्हा लाॅकडाऊन होण्याची शक्यता दर्शविली आहे. अशा परिस्थिती मध्ये काय करावं?


सरकारने जसे सर्व छोटे - मोठे उद्योगधंदे,व्यवसाय शासकीय व खाजगी कार्यालये बाजारपेठ चालू केल्यात तसेच कार्यक्रम चालू करावेत जेणे करून हे कलाकार आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतील आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही किंवा आत्महत्या करणार नाहीत, म्हणजेच जगा आणि जगू द्या..

राष्ट्रीय दर्जा आर्टिस्ट शैलेश कांबळे याच निराश जनक वक्तव्य राष्ट्रीय दर्जा आर्टिस्ट शैलेश कांबळे याच निराश जनक वक्तव्य Reviewed by News1 Marathi on February 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads