Header AD

कल्याण डोंबिवलीत ८० नवे रुग्ण

 

◆६०,९३० एकूण रुग्ण तर ११४८ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ६९ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ८० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही.          आजच्या या ८० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६०,९३० झाली आहे. यामध्ये ७६४ रुग्ण उपचार घेत असून ५९,०१८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तर आतापर्यत ११४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१७कल्याण प – ३१डोंबिवली पूर्व – २१ डोंबिवली प-४मांडा टिटवाळा- ४तर मोहना येथील ३ रूग्णांचा समावेश आहे.      डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ८ रुग्ण टाटा आमंत्रा येथून३ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून६ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून तर ७ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ८० नवे रुग्ण कल्याण डोंबिवलीत  ८० नवे रुग्ण   Reviewed by News1 Marathi on February 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads