Header AD

५९%विद्यार्थी परीक्षेच्या तयारी साठी करतात एडटेक अॅप्सचा वापर: ब्रेनली
मुंबई, १८ फेब्रुवारी २०२१ : अंतिम परीक्षा जवळ येत असल्याने भारतीय विद्यार्थ्यांपैकी ५८.९% विद्यार्थी परीक्षेच्या तयारीसाठी एडटेक प्लॅटफॉर्मचा वापर करत असल्याचे ब्रेनलीच्या ताज्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्वेक्षणात देशभरातील ९,०२९ विद्यार्थ्यांनी आपली मते मांडलीत.


परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या सर्वच साधनांचा वापर करत आहेत. प्रतिसाद दिलेल्यांपैकी २३% विद्यार्थी म्हणाले की, ते समवयस्करांची मदत घेतात, तर १७.५% व १५.२% विद्यार्थी अनुक्रमे ट्यूटर्स (कोचिंग तज्ञासह) आणि पालकांची मदत घेतात. १०.९% विद्यार्थ्यांनी सांगितले की ते त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रियपणे एडटेक प्लॅटफॉर्मचा वापर करतात. तर ३३% सहभागी म्हणाले की त्यांनी उपलब्ध सर्व पर्यायांचा वापर केला. एडटेक प्लॅटफॉर्मवर किती प्रमाणात अवलंबून आहात, असे विचारले असता ५८.९% विद्यार्थी म्हणाले की ते अशा प्लॅटफॉर्मवर अवलंबून आहेत तर २०.२% विद्यार्थी अशा प्लॅटफॉर्मवर खूप अवलंबून असल्याचे म्हणाले.


ब्रेनलीचे सीपीओ राजेश बिसाणी म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शिक्षणासाठी एडटेक प्लॅटफॉर्मचे महत्त्व पुन्हा एकदा या सर्व्हेद्वारे अधोरेखित झाले आहे. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी एडटेक प्लॅटफॉर्मचे महत्त्व मान्य केले. एवढेच नाही तर त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे ते अविभाज्य अंग बनले आहेत. भविष्यात अशा प्लॅटफॉर्मवर नियमित क्लासेस घेतले जातील ही स्थिती पाहणे औत्सुक्याचे ठरेल.”


ब्रेनली हा जगातील सर्वात मोठा ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. यात ३५० दशलक्ष विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा एकत्रित शिक्षण घेणारा ग्रुप आहे. या प्लॅटफॉर्मवर भारतात ५५ दशलक्षांपेक्षा जास्त असून आणखी एक विद्यार्थ्याचा मोठा वर्ग अमेरिका, रशिया, इंडोनेशिया, ब्राझील आणि पोलंडमध्ये विस्तारलेला आहे.

५९%विद्यार्थी परीक्षेच्या तयारी साठी करतात एडटेक अॅप्सचा वापर: ब्रेनली ५९%विद्यार्थी परीक्षेच्या तयारी साठी करतात एडटेक अॅप्सचा वापर: ब्रेनली Reviewed by News1 Marathi on February 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads