Header AD

पालिकेच्या कारवाईत ५५ किलो प्लास्टिक जप्त तर ६२ हजार ५०० रुपये दंड वसूल
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची प्लास्टिक विरोधी कारवाई सुरुच असून काल दिवसभरात कारवाईत ५५ किलो प्लास्टिक जप्त करत ६२ हजार ५०० रुपये दंड पालिकेने वसूल केला आहे.


पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे कल्याणमधील मुख्य आरोग्य निरीक्षक लखीचंद पाटील व डोंबिवली विभागातील मुख्य आरोग्य निरीक्षक नरेंद्र धोत्रे यांनी आपल्या कर्मचारी  वर्गासह कल्याण व डोंबिवली परिसरात ठिकठिकाणी पाहणी करून काल दिवसभरात सुमारे ५५ किलो प्लास्टिक जप्त केले असून प्लास्टिक वापरापोटी ६२ हजार ५०० रुपये इतका दंड संबंधितांकडून वसूल केला.


पर्यावरणाला हानिकारक असलेल्या सिंगलयुज प्लास्टिकचा वापर सर्वांनी टाळावा आणि महानगरपालिकेच्या शून्य कचरा मोहीमेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.

पालिकेच्या कारवाईत ५५ किलो प्लास्टिक जप्त तर ६२ हजार ५०० रुपये दंड वसूल पालिकेच्या कारवाईत ५५ किलो प्लास्टिक जप्त तर ६२ हजार ५०० रुपये दंड वसूल  Reviewed by News1 Marathi on February 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads