Header AD

कल्याणात वाहतूक पोलिसांना मारहाणीचे सत्र सुरूच

 

मद्यपी वाहनचालकाने वाहतूक पोलीस कार्यलयात घातला धिंगाणा....


कल्याण , कुणाल म्हात्रे  : कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांना मारहाणीचे सत्र सुरूच असून मद्यपी वाहनचालकाने वाहतूक पोलिसाची कॉलर पकडत धक्काबुक्की केल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे.  



बुधवारी रात्रीच्या सुमारास वाहतूक पोलीसांची कल्याण पाश्चिम परिसरात ड्रिंक एन्ड ड्राइव्हची कारवाई सुरू होती. याच दरम्यान एका मद्यपी टेम्पो चालकावर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई दरम्यान दारूच्या नशेत झिंगत असलेल्या या टेम्पो चालकाने चक्क वाहतूक पोलीस कर्मचारी प्रकाश जाधव यांची कॉलर धरत त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. पोलिसांनी तत्काळ या मद्यधुंद चालकाला ताब्यात घेत कल्याण वाहतूक पोलीस कार्यालयात आणले. या कार्यलयात देखील त्याने एकच धिंगाणा घालत वाहतूक पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली व पोलिसांच्या अंगावर धावून गेला.



 हा सर्व प्रकार व्हिडियोत कैद झाला असून या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात मद्यपी वाहनचालक गोकुळ पदघन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी दिली. दरम्यान या घटनेमुळे वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून याबाबत कठोर पावले उचलण्याची मागणी वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे. 


कल्याणात वाहतूक पोलिसांना मारहाणीचे सत्र सुरूच कल्याणात वाहतूक पोलिसांना मारहाणीचे सत्र सुरूच Reviewed by News1 Marathi on February 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads