Header AD

दिव्यांग बांधवांची मनसेच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कार्यालयावर धडक

 भिवंडी दि. १७  , प्रतिनिधी  ) तालुक्यातील आर्थिक सुबत्ता असलेल्या सरवली ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांगांची होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे भिवंडी ग्रामीणचे तालुकाध्यक्ष परेश बाळाराम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सरवली ग्रामपंचायत मध्ये ग्रामविकास अधिकारी व्ही.डी. धोंडगे यांची सोमवारी भेट घेऊन दिव्यांगांच्या समस्यांचा पाढा वाचला व आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन देखील ग्राम विकास अधिकाऱ्यांकडे दिले.


            सरवली ग्रामपंचायत परिसरातील जवळपास २२ हुन अधिक दिव्यांगांना मागील ५ वर्षांपासून त्यांच्या हक्काचा ५% दिव्यांग निधी वितरित केला गेला नसून त्यांना कोणत्याही शासकीय योजनेत सहभागी करून घेतले नसल्याचा आरोप करत येथील सर्व दिव्यांग बांधवांनी एकत्रित येऊन मनविसेनेचे तालुकाध्यक्ष परेश चौधरी यांना भेटून सदर प्रश्न मार्गी लावण्याची विनंती दिव्यांग बांधवांनी केली असता चौधरी यांनी या गंभीर बाबीची दखल घेत ग्रामविकास अधिकाऱ्यांना लेखी पत्र देत गावातील सर्व दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचे ५% दिव्यांग निधी तात्काळ वितरित करण्यात यावा अशी मागणी केली असता ग्राम विकास अधिकाऱ्यांनी येत्या मार्च महिन्याच्या अखेरीस सन २०२०-२०२१ ची सुमारे १० लाख निधी वितरित करण्याचे आश्वासन दिले असून यापुढे दिव्यांग बांधवाना शासकीय योजनेपासून लाभ घेण्यासाठी नव्याने निवडून आलेल्या सरपंच स्वतः पुढाकार घेतील असे आश्वासन देखील ग्रामविकास अधिकारी यांनी उपस्थितांना दिले आहे. सदर प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शरद गजानन चौधरी ,  दिव्यांग बांधव सागर चौधरी सर,  दिलीप चौधरी, पंडीत पाटील आदी उपस्थित होते.

दिव्यांग बांधवांची मनसेच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिव्यांग बांधवांची मनसेच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कार्यालयावर धडक Reviewed by News1 Marathi on February 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads