रिंग रोडमध्ये बाधित ११ रूम निष्कासित करण्याची पालिकेची कारवाई
कल्याण, कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अ प्रभाग क्षेत्रातील मांडा टिटवाळा येथील रिंग रोडमध्ये बाधित होणाऱ्या शामकुमार गुप्ता यांच्या ११ रूम निष्कासित करण्याची कारवाई आज अ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल आणि त्यांच्या पथकामार्फत करण्यात आली. हि कारवाई स्थानिक पोलिस यांच्या मदतीने व जेसीबीचा वापर करून करण्यात आली. त्याचप्रमाणे इंदिरानगर टेकडीवरील मंदा त्रिभूवन यांचा अनधिकृत १ गाळा व ३ रूम निष्कासित करण्याची कारवाई देखील अ प्रभागक्षेञ सुधीर मोकल यांच्या पथकामार्फत करण्यात आली.
त्याचप्रमाणे कल्याण पुर्व येथील ४-जे प्रभागक्षेञातही क्रिस्टल प्लाझा इमारतीच्या बाजूला आरक्षित जागेवर मे.एटीसी टेल्कम इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि या कंपनीने उभारलेल्या मोबाईल टॉवरवर ४-जे प्रभागक्षेञ अधिकारी भरत पाटील आणि त्यांच्या पथकाने कारवाई करून सदर मोबाईल टॉवरचा विदयुत पुरवठा खंडीत केला आणि टॉवरचे विदयुत मिटर महावितरणला परत करण्यात आले.

Post a Comment