ब्रिजस्टोन इंडियाच्या वतीने सिलेक्ट + कन्सेप्ट स्टोअर लॉन्च, डिजीटल एलईडी टायर खरेदी आणि सेवा अनुभव उपलब्ध करून देणार
मुंबई,10 फेब्रुवारी : ब्रिजस्टोन इंडियाच्या वतीने आज देशातील पहिले कन्सेप्ट स्टोअर लॉन्च करण्यात आले. या माध्यमातून एज्युकेटीव्ह टायर खरेदी आणि सेवा अनुभव मिळणार आहे. ब्रिजस्टोन सिलेक्ट + ही ब्रिजस्टोन इंडियाची सर्वोत्तम रिटेल आऊटलेटची श्रेणी असून ग्राहकांना परस्परसंवादी अनुभव प्रदान करेल. याचवेळी ते टायर तसेच टायर संबंधी सेवा उपलब्ध करून देतील. ब्रिजस्टोन सिलेक्ट + या ब्रिजस्टोन इंडियाच्या विक्री दालनात उत्पादनांची सर्वोत्तम श्रेणी मिळेल. नवीन ब्रिजस्टोन सिलेक्ट + स्टोअरमार्फत ग्राहकांना टायर निवडीचा डिजीटल-प्रणीत अनुभव उपलब्ध होईल. विविध प्रकारच्या टायरची माहिती जाणून घेणे तसेच ग्राहकांच्या ड्रायव्हिंग गरजा समजून घेण्यासाठी ही दालने उपयुक्त ठरतील. पुण्यापासून सुरुवात करून, 2021 च्या अखेरीपर्यंत देशातील विविध शहरांत ही स्टोअर्स सुरू करण्याचा ब्रिजस्टोन इंडियाचा मानस आहे.
वाहनाची कामगिरी सर्वोत्तम राहावी या दृष्टीने टायर अधिक महत्त्वपूर्ण ठरतात, रस्त्यांवरील सुरक्षेची हमी टायर देतात. मात्र या टायरकडे ग्राहक वर्गाचे म्हणावे तसे लक्ष नसते. या कन्सेप्ट स्टोअरच्या माध्यमातून ब्रिजस्टोन इंडियाचे उद्दिष्ट हे ग्राहकांकरिता अशाप्रकारच्या स्टोअरमधून टायर सेवा देऊन सर्वोच्च सहभागीता तसेच माहितीपूर्ण अनुभव उपलब्ध करून देण्याचे आहे.
पुणे येथील स्टोअरमध्ये ग्राहकांच्या बराच काळ रेंगाळलेल्या गरजा जाणून त्यानुसार टायर निवड आणि उत्तम देखभाल उपलब्ध करून दिली जाईल. ही प्रक्रिया परस्परसंवादी डिजीटल किओस्कने युक्त आहे. जिथे ग्राहकांना ब्रिजस्टोनच्या विस्तृत उत्पादन श्रेणीतून आपल्या पसंतीची उत्पादने निवडता येतील. या स्टोअरमध्ये ग्राहकांना उत्पादनांचे प्रात्यक्षिक सादरीकरण करून दिले जाते, जेणेकरून प्रत्येक टायर सेवांचा परिणाम समजून घ्यायला मदत मिळते आणि ग्राहकांना त्यांच्या टायरचे सर्वोत्तम परिणाम मिळतात.
"शाश्वत दळणवळण आणि अत्याधुनिक पर्यायांमधील वैश्विक नेतृत्व असलेल्या ब्रिजस्टोनचे उद्दिष्ट आमच्या ग्राहकांना सर्वोच्च दर्जाची सेवा प्रदान करण्याचे आहे. ब्रिजस्टोन सिलेक्ट + रिटेल स्टोअर्सच्या श्रेणींमधून आम्ही विक्री अनुभवाच्या नवआविष्कारातील संस्थापक बनण्याच्या प्रयत्नात आहोत. या माध्यमातून आमच्या ग्राहकांना अधिक माहितीसंपन्न आणि सहभागीतापूर्ण खरेदीचा निर्णय घेता येईल. ब्रिजस्टोन सिलेक्ट + च्या माध्यमातून आम्ही सर्वोत्तम टायर आणि टायर सेवा अनुभव यांच्यातील फरक अधोरेखित करू”, असे ब्रिजस्टोन इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर पराग सातपुते म्हणाले.
नवीन ब्रिजस्टोन सिलेक्ट + स्टोअरद्वारे टायर निवडताना डिजीटल तसेच अनुभवी सहभागीतेचा अनुभव मिळेल, विविध प्रकारचे टायर आणि ग्राहकांच्या ड्रायव्हींग गरजांमधील त्यांची गरज समजून घेण्यात मदत होईल. टायर सल्ला हा केवळ चांगल्या दरातील टायर खरेदीपर्यंत मर्यादीत नसेल. तर, कार टायर तसेच ड्रायव्हींग स्थितीनुरूप ग्राहकाला सर्वात साजेशी निवड करता येणार आहे. ब्रिजस्टोन सिलेक्ट + स्टोअर्समध्ये उपलब्ध सेवांमध्ये पुढील घटकांचा समावेश राहील:
· ब्रिजस्टोन टायर उत्पादनाच्या श्रेणीवर टायर सल्ला आणि माहिती.
· डिजीटल टायर सिलेक्शन डेस्क, प्रात्यक्षिक आणि टायर सेवा समजून त्याआधारे टायर निवडीविषयी सल्ला
· त्यांच्या यशस्वी टायर सेवा सतेच सेवा पॅकेज – अलाईनमेंट, बॅलन्सिंग, नायट्रोजन, रोटेशन तसेच तत्सम उपलब्ध राहील, ब्रिजस्टोनकडून विविध टायर पॅटर्न्सवर टच अँड फिल एक्स्पिरीअन्स.
"नवीन ब्रिजस्टोन सिलेक्ट + श्रेणीची दालने नवीन रिटेल मॉडेल म्हणून उदयाला येत आहेत. आमचे उद्देश हा विक्रेता स्टोअरमध्ये डिजीटायजेशन उपलब्ध करून आधुनिक डिजीटल ग्राहकांच्या पसंतीचा अनुभव देण्याचा आहे. तंत्रज्ञानातील नेतृत्व म्हणून आमच्या ग्राहकांना अनोखा ब्रँड अनुभव देण्याकडे आमचा कल आहे. वाहनाची कामगिरी तसेच सुरक्षा पाहता टायर हा भाग अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या ब्रिजस्टोन सिलेक्ट + रेंज स्टोअर सोबत आमच्या ग्राहकांमध्ये अधिकाधिक जागरूकता आणि सहभागीता निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” अशी माहिती ब्रिजस्टोन इंडियाचे चीफ मार्केटींग ऑफिसर दीपक गुलाटी यांनी दिली.
Post a Comment