Header AD

कल्याण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

 

◆आरक्षण सोडतीमुळे कही ख़ुशी कही गम...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या निर्देसानुसार कल्याण तालुक्यातील ४१ ग्राम पंचायत सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात कल्याणचे तहसीलदार दिपक आकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरक्षण सोडत जाहीर झाली.


गेल्या महिन्यात १५ तारखेला ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक झाली होती. तर १८ जानेवारीला त्याची मतमोजणी पार पडली होती. आज झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी 3, अनुसूचित जमाती , नागरिकांचा मागास प्रवर्ग ११ जागा आणि स्त्रियांकरता एकूण जागांपैकी १२ जागा राखीव अशा पद्धतीने आरक्षण काढण्यात आल्याची माहिती तहसीलदार दिपक आकडे यांनी दिली.


दरम्यान या आरक्षण सोडतीमुळे सरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या अनेकांच्या स्वप्नांवर अनेक ठिकाणी महिला तसेच इतर आरक्षण पडल्याने विरजण पडले आहे. तर एकंदरीत पाहता कही ख़ुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कल्याण तालुक्यात कोणता पक्ष सरस ठरतो हे सरपंच पदाच्या निवडीनंतरच समजणार असून राजकीय पक्षांचे दावे किती खरे होते याचे चित्र स्पष्ट होणार आहे.  


कल्याण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे

अनुसूचित जाती :- गोवेली रेवती (अनुसूचित जातीसर्वसाधारण)

अनुसूचित जाती (स्त्री) :- (चिठ्ठी काढून) वरपनिंबवली मोस

अनुसूचित जमाती :-  चवरेकांबा

अनुसूचित जमाती (स्त्री) - म्हसकळ अनखळ

नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री:- कुंदेफळेगावआपटी मांजर्लीनडगाव दानबावरायते पिंपळोली

नागरिकांचा मागास प्रवर्ग :- घोटसईगेरसेवेहळेआणे भिसोळराया ओझर्लीम्हारळ

सर्वसाधारण महिला :- पोईवडवली शिरढोणउशीद आराळेबेहरेवासुंद्रीपळसोलीसांगोडे कोंढेरीणे चिंचवलीनवगाव बापसईखोणी वडवलीमानिवली, रोहन अंताडे  

सर्वसाधारण :- दहीवली अडवलीगुरवलीवसत शेलवली,  काकडपाडादहागाववाहोलीरुंदे आंबिवलीनांदपमामणोलीकोसलेकेळणी कोलमजांभूळ मोहीली


कल्याण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर कल्याण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर Reviewed by News1 Marathi on February 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads