Header AD

मलंगरोड ते उल्हासनगर रस्ता रूंदीकरणाचा मार्ग मोकळा

 

◆बाधित होणाऱ्या ४२ बांधकामांवर पालिकेची कारवाई ..


कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कल्याण पूर्वेतील मलंग रोड ते उल्हासनगर हद्दीपर्यंत १०० फुटी रस्त्यात बाधित होणारी ४२ बांधकामे निष्कासित करण्याची धडक कारवाई मनपाने करीत रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा केला आहे.


केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि विभागीय उपआयुक्त (ड प्रभाग) अनंत कदम यांच्या  मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ५/ड प्रभाग क्षेत्र परिसरातकल्याण पूर्वेतील मलंग रोड ते उल्हासनगर हद्दीपर्यंत ३० मीटर रस्त्यात बाधित होणारी बांधकामे निष्कासित करण्याची धडक कारवाई प्रभागक्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडेउप अभियंता प्रशांत भुजबळ यांनी ५/ड व ४/जे प्रभागातील अतिक्रमण विरोधी पथकामार्फत व महानगरपालिकेच्या पोलिस पथकाच्या सहकार्याने केली.


या कारवाईत रस्ता रुंदीकरणात बाधित होणारी एकुण ४२ बांधकामे निष्कासित करण्यात आली. या रस्त्याची लांबी २.४ किमी असून रुंदी ३० मीटर(१०० फूट) आहे. ही कारवाई करतांना बाधित बांधकामधारकांनी सहकार्य केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. हा रस्ता पूना-लिंक रस्त्याला समांतर रस्ता असून हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर पूना -लिंक रस्त्यावरील वाहतूक कमी होऊन वाहतुक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे


  तसेच महापालिकेच्या ९/आय प्रभागातीलपिसवली परिसरातही प्रभागक्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांनी आय प्रभागातील अतिक्रमण विरोधी पथक व पोलिस पथक यांच्या सहाय्याने काल दिवस भरात १० अनाधिकृत बांधीव जोते व ८ अनाधिकृत रुमवर निष्कासित करण्याची धडक कारवाई केली.
मलंगरोड ते उल्हासनगर रस्ता रूंदीकरणाचा मार्ग मोकळा मलंगरोड ते उल्हासनगर रस्ता रूंदीकरणाचा मार्ग मोकळा Reviewed by News1 Marathi on February 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads