Header AD

कल्याण परिमंडलात वीजबिलाची थकबाकी पोहचली ६०० कोटींवर

 

■वर्षभरापासून बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा होतोय खंडित....


कल्याण , कुणाल  म्हात्रे :  महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीजबिल थकबाकी तब्बल ६०० कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहचली आहे. या विक्रमी थकबाकीसह चालू वीजबिल वसूल करण्यासाठी सध्या व्यापक मोहीम सुरु आहे. परिमंडलातील वीज ग्राहकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत ७३३ कोटी रुपयांच्या वीजबिलाचा भरणा केला. परिमंडलातील इतर ग्राहकांनीही चालू वीजबिलासह थकबाकी भरून कठीण आर्थिक परिस्थितीत महावितरणला सहकार्य करावेअसे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे. 


कल्याण परिमंडलात सर्व वर्गवारीचे जवळपास २६ लाख वीज ग्राहक आहेत. यातील २ लाख ३२ हजार ग्राहकांनी मार्च २०२० नंतर गेल्या वर्षभरात वीजबिलाचा एक रुपयाही भरलेला नव्हता. या ग्राहकांकडे २३० कोटी रुपयांची थकबाकी होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सातत्याने पाठपुरावा व विनंती केल्यानंतर यातील १ लाख ५४ हजार ग्राहकांनी त्यांच्या वीजबिलाचा भरणा एकरकमी अथवा हप्त्याने केला.


 परंतु अजूनही ७८ हजार ग्राहकांनी वीजबिल भरणे टाळले असून त्यांच्याकडे ७० कोटी रुपयांची थकबाकी आहे. अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी चोरून अथवा इतरांकडून वीजपुरवठा सुरु ठेवल्याचे आढळल्यास संबंधित ग्राहक व अनधिकृतपणे वीज देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दहा पथकांची करडी नजर या ग्राहकांवर राहणार आहे.  


फेब्रुवारी महिन्यात ६६० कोटी रुपये चालू वीजबिल व ६७५ कोटी रुपये थकबाकी अशा एकूण १३३५ कोटी रुपयांचा भरणा आवश्यक होता. परंतु तब्बल ६०० कोटी रुपयांच्या थकीत वीजबिलाची अद्याप वसुली होऊ शकलेली नाही. या थकबाकीचे ओझे घेऊनच महावितरण कर्मचाऱ्यांना मार्च अखेरच्या वसुलीला सामोरे जावे लागणार आहे. महावितरणची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन व अखंडित विजेसाठी चालू वीजबिल व थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावेअसे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे.

कल्याण परिमंडलात वीजबिलाची थकबाकी पोहचली ६०० कोटींवर कल्याण परिमंडलात वीजबिलाची थकबाकी पोहचली ६०० कोटींवर Reviewed by News1 Marathi on February 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads