Header AD

भिवंडी महापालिका कर्मचारी संदेश भोईर यांचे निधन..
भिवंडी दि 28( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील कर्मचारी संदेश शांताराम भोईर यांचे वयाचा 38 वर्षी  तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने आकास्मित निधन झाले असून ते राहत असलेल्या खडक रोड परिसरात आणि महापालिका आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन लहान मुली आहेत संदेश भोईर यांचा मनमेळावू पणा असल्याने तीनबत्ती बाजारपेठेत व्यापारी आणि नागरिकांबरोबर त्यांचे चांगले संबंध होते कांदा, बटाटा मार्केट मध्ये त्यांचे घनिष्ट संबंध असल्याने कोणत्याही कार्यासाठी कांदा, बटाटा घेण्यासाठी महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि बहुसंख्य नागरिक त्यांच्याशी संपर्क साधतं होते त्याप्रमाणे कामाच्या बाबतीत त्यांची कडक भूमिका असल्याने त्यांच्यावर सोपावलेले काम पूर्ण केल्याशिवाय ते गप्प बसत नव्हते त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे त्यांच्या शोकसभेचा कार्यक्रम 7 मार्च रविवारी खडकरोड या ठिकाणी होणार आहे.मात्र यांच्या निधनाने महापालिका प्रशासन आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी आणि त्यांना सोयी सुविधा पुरवण्यात अपयशी ठरत असल्याचे समोर येत असून अवघ्या 38 व्या वर्षी संदेश भोईर यांचे निधन होणे हे धक्कादायक आसल्याचे कर्मचाऱ्यामधून बोलले जात आहे.
भिवंडी महापालिका कर्मचारी संदेश भोईर यांचे निधन.. भिवंडी महापालिका कर्मचारी संदेश भोईर यांचे निधन.. Reviewed by News1 Marathi on February 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads