Header AD

गॅस दरवाढ भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी चुलीवर खिचडीसह थापल्या भाकरी ..



भिवंडी  ,  प्रतिनिधी  :  गेल्या काही दिवसांपासून देशातील महागाईचा दर प्रचंड वाढलेला आहे. दर आठवड्याला गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. तर, इंधनाचेही दर प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेटही कोलमडले आहे. याचा निषेध करण्यासाठी राज्यभर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलने करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून आज भिवंडीतही  आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

 

केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे देशवासियांना महागाईचा भार ....


यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या स्वाती कांबळे  यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे देशवासियांना महागाईचा भार सहन करावा लागत आहे. सदर आठवड्याला सिलिंडरचे दर वाढविले जात आहेत. मागील महिन्यात 190 रुपयांनी दरवाढ केल्यानंतर मागील आठवड्यात 25 रुपयांनी दरवाढ केली आहे. 


त्यातच आता एक लाखांची उत्पन्न मर्यादा असलेल्यांनाच शिधावाटप पत्रिका देण्यात येणार आहेत. म्हणजेच एक लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहेत.  मोदी सरकारच्या या धोरणांमुळे सामान्य माणसाला जगणे नकोसे झाले आहे. आता पुन्हा आम्हाला अश्मयुगात नेण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्याचा निषेध करण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने  महिलासह भिवंडी राष्ट्रवादीचे पदाधिकारी  सहभागी झाले होते. 


गॅस दरवाढ भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी चुलीवर खिचडीसह थापल्या भाकरी ..  गॅस दरवाढ  भिवंडीत  राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी चुलीवर  खिचडीसह थापल्या भाकरी .. Reviewed by News1 Marathi on February 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads