शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागरिकांना अनोखी भेट...
डोंबिवली , शंकर जाधव : डोंबिवलतील कोपर रोड प्रभागामध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री संतोषी माता मंदिर चौक ते सुंदराबाई रोड या रस्त्याचा कॉंक्रिटीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.यावेळी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे म्हणाले, ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण या अनुषंगाने आम्ही काम करतो. आम्ही नेहमी समाजकार्य करत असतो.पक्षाचे माध्यमातून अनेक योजना कार्य आम्ही राबवलेला आहे.
समाजकार्य करणे आमचे धोरण असून सदैव करत राहू.नगरसेवक म्हात्रे यांच्या कार्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले.यावेळी ज्येष्ठ नागरीक म्हणाले,नगरसेवक म्हात्रे हे नेहमी समाज कार्य करत असतात.कुठली प्रकारची समस्या असो ते नेहमी आमच्या पाठीशी असतात. कोरोना काळात त्यांनी गोर-गरीब आणि गरजु लोकांना आर्थिक मदत व वैद्यकीय उपचार मदत केली.तसेच विद्यार्थ्यांसाठी फी कमी करून देणे, रस्ते नाले पथदिवे विभागांमध्ये साफसफाई आधीचा त्यांनी भरपूर लक्ष दिले. राजकारण न करता नेहमी समाजसेवा करत असतात.

Post a Comment