रासायनिक कंपन्या मध्ये विजेच्या कंपणामुळे होणाऱ्या असुरक्षित बाबत डोंबिवलीत प्रशिक्षण कार्यशाळा
डोंबिवली , शंकर जाधव : `रासायनिक कंपन्यामध्ये विजेच्या कंपणामुळे होणाऱ्या असुरक्षितबाबत` या विषयावर कामा संघटना आणि आणि औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचलनायल यांच्या वतीने कामा कार्यालयात एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.सोशल डिस्टेंशिंग आणि तोंडावर मास्क आदी नियमाचे पालन या कार्यशाळेत करण्यात आले. यावेळी औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचलनालय कल्याणचे सहसंचालक विनायक लोंडे, उपसंचालक लक्ष्मीकांत गोराणे, कामा अध्यक्ष देवेन सोनी, मार्क कमिटीचे संजय दिक्षित, विकास पाटील, उदय वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणूनआयएसओ प्रमाणित सरकारी, लेखापाल अविनाश काळे यांनी कंपन्यामधील रासायनिक कंपन्यामध्ये विजेच्या कंपणामुळे होणाऱ्या असुरक्षितबाबत कशी सुरक्षा बाळगावी लागते याचे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.सर्व कारखानदारांनी नियम पाळायचे असतात.
सुरक्षितते जागरूकता रहावी यासाठी अश्या शिबिरांचे आयोजन केले जाते, अश्या प्रकारची कार्यशाळा दर महिन्याला होत असते अशी माहिती कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी दिली या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बापजी चौधरी यांनी केले.कामा कार्यालयात अश्या प्रकारची कार्यशाळा दर महिन्याला होत असते अशी माहिती कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी दिली .

Post a Comment