निरंकारी बाबा हरदेव सिंहजी यांच्या जन्मदिनी वृक्षारोपण व वृक्ष संरक्षण अभियान
कल्याण , कुणाल म्हात्रे : निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून संत निरंकारी मिशनच्या वतीने डोंबिवली मंडळाच्या झोन 35-ए अंतर्गत विविध ठिकाणच्या १९ ब्रांच मध्ये ३ हजारहून अधिक वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामीण भागात सार्वजनिक ठिकाणी तर शहरी भागात घरोघरी झाडं लावण्यात आली. यामध्ये
डोंबिवली, गोग्रासवाडी, ठाकुर्ली, सोनारपाडा, कल्याण, द्वारलीपाडा, भिसोळ, टिटवाळा, सावर्णे, भिवंडी, ब्राम्हणआळी, गायत्रीनगर, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, वाशिंद, कसारा आदी ठिकाणी मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरक्षण क्र ३६ उंबर्डे हरित क्षेत्र प्रकल्प सन २०१७/१८ हरित क्षेत्र विकास योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक तयार करण्यात आले असून या ठिकाणी दररोज नागरिक सकाळची शुद्ध हवा आणि निसर्गाच्या सानिध्यात चालण्यासाठी येत असतात. या ठिकाणी मिशनच्या वतीने विविध झाडांची लागवड करण्यात आली. या वृक्षांचे संवर्धन करण्याची हमी देखील संत निरंकारी मंडळाने घेतली आहे.
तर मुरबाड नजीक सावर्णे ब्रांचच्या वतीने अहमदनगर कल्याण महामार्गापासून सावर्णे गावा पर्यंत रस्त्याच्या कडेला आंबा चिंच फणस जांभूळ आवळा सिताफळ आदी झांडाची लागवड करण्यात आली. प्रत्येक सदस्यांना एक झाड दत्तक देऊन त्याच्या संरक्षणाची व संगोपनाची पूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली.

Post a Comment