Header AD

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त खेळाडूंना क्रिकेटचे साहित्य वाटप

 

◆माजी नगरसेवक कैलास शिंदे यांचा पुढाकार...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याणमध्ये खेळाडूंना क्रिकेटच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेत कल्याण पूर्वेतील प्रभाग क्र. ४५ कचोरे येथील हनुमान नगर येथे हा उपक्रम घेण्यात आला. माजी रणजी प्लेयर मनोहर शिंदे यांच्याहस्ते परिसरातील खेळाडूंना हे साहित्य देण्यात आले.


       कल्याण मध्ये देखील चांगले खेळाडू असून त्यांच्या या गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांनी आणखी चांगलं क्रिकेट खेळावे, चांगले खेळाडू घडावे या हेतूने माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी कचोरे आणि आसपासच्या परिसरातील क्रिकेट खेळणाऱ्या २५ हून अधिक संघाना क्रिकेटचे साहित्य दिले. क्रिकेट खेळण्यासाठी कल्याण पूर्वेतील खेळाडूंना चांगले मैदान नसून यासाठी आपण खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून खेळाडूंना चांगले मैदान उपलब्ध करून देणार असून, मुंबईच्या धर्तीवर याठिकाणी क्रिकेटचा सराव करून कल्याणचे नाव क्रिकेटमध्ये गाजवतील असा विश्वास कैलास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

       
तर माजी रणजी खेळाडू मनोहर शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, कल्याण डोंबिवलीमध्ये देखील चांगले खेळाडू असून भारतीय संघ, आयपीएल अशा विविध स्पर्धामध्ये त्यांनी खेळून कल्याणचं नाव मोठं केलं आहे. कैलास शिंदे यांनी खेळाडूंना केलेल्या मदतीने आणखी चांगले खेळाडू घडतील असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. यावेळी सनम शेख, प्रदीप गायकवाड, नागेश बेंडर, युसुफ मेमन, प्रभाकर म्हात्रे आदी पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते. 
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त खेळाडूंना क्रिकेटचे साहित्य वाटप खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त खेळाडूंना क्रिकेटचे साहित्य वाटप Reviewed by News1 Marathi on February 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads