Header AD

भिवंडीत करोना रोखण्या साठी पोलीस व महानगर पालिका प्रशासन सरसावले , मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
भिवंडी : दि.२१ (प्रतिनिधी  ) मागील वर्षभराच्या करोना संकटातून सावरलेल्या नागरीकांचे जीवन सर्वसामान्य होत पूर्वपदावर येत असतानाच महाराष्ट्रात करोना च्या दुसऱ्या लाटेस सुरवात झाली आहे. काही जिल्ह्यां मध्ये परिस्थिती गंभीर असल्याने राज्य शासनाने पुन्हा एकदा मास्क लावणे, सामाजिक अंतर बाळगणे या बाबत आग्रह धरला असून मास्क न लावलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.              भिवंडी शहरात करोना परिस्थिती सध्यातरी आटोक्यात असली तरी त्या बाबत काळजी घेणे गरजेचे असल्याने धामणकर नाका ,अंजुरफाटा ,कल्याण नाका ,मंडई ,वंजारपट्टी नाका या चौक चौकात पोलीस व महानगरपालिका पथकाने मास्क न लावणाऱ्या वाहन चालकांवर संयुक्त कारवाई करण्यास सुरुवात केली असून मास्क न लावणाऱ्या वाहन चालकांकडून महानगरपालिका कर्मचारी ५०० रुपये वसूल करून दंडपावती देत ही दंडात्मक कारवाई सुरू केली आहे .भिवंडी शहरात करोना परिस्थिती आज ही आटोक्यात असल्याने त्या बाबत नागरीकांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे पोलीस व महानगरपालिका यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.
भिवंडीत करोना रोखण्या साठी पोलीस व महानगर पालिका प्रशासन सरसावले , मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई भिवंडीत करोना रोखण्या साठी  पोलीस व महानगर पालिका प्रशासन सरसावले , मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई Reviewed by News1 Marathi on February 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे कारा गृहातील इतिहास म्युरल्स द्वारे जिवंत होणार..

■जिल्हाधिकारी, कारागृह, सार्वजनिक बांधकाम प्रशासना सह आमदार संजय केळकर यांचा पाहणी दौरा.. ठाणे, प्रतिनिधी  :  ऐतिहासिक ठाण्याचे मानबिन्दू अस...

Post AD

home ads