Header AD

कल्याण मध्ये रंगणार भव्य शिवगान स्पर्धा

 

◆भाजपा कला व सांस्कृतिक सेल कडून द्विस्तरीय शिवगान स्पर्धेचे आयोजन...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याणमध्ये भव्य शिवगान स्पर्धा रंगणार असून भाजपा प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठच्यावतीने द्विस्तरीय शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ९ फेब्रुवारी रोजी कला व सांस्कृतिक सेल कल्याण डोंबिवली जिल्हाच्या वतीने कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन केले असून या स्पर्धेचा समारोप १९ फेब्रुवारी शिवजयंती दिनी अजिंक्यतारा किल्ल्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी कोकण संयोजक राहुल वैद्य, कल्याण जिल्हा संयोजक सुधीर भगत, कल्याण महिला अध्यक्षा अल्पा गाधेर, जिल्हा सहसंयोजक प्रमोद पांडव आदीजण उपस्थित होते.


ही स्पर्धा राज्यातील ४० ठिकाणी होणार आहे. या स्पर्धेत १५ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होतील. वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धा एकत्रच होतील, मात्र परीक्षण स्वतंत्रपणे होणार आहे. शिवगान स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील ओवी, आरती, पाळणा, पोवाडा, स्फुर्ती गीत यांचे सादरीकरण केले जाणार आहे. जिल्हास्तरावर पहिल्या तीन क्रमांकाचे आणि उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जाणार आहेत.  प्रथम क्रमांकाला अंतिम स्पर्धेसाठी किल्ले अजिंक्य तारा सातारा येथे स्पर्धेत सहभागी होता येईल.  ही स्पर्धा विनाशुल्क असून स्पर्धेच्या कालावधीत कोरोना संबंधित शासकीय नियम पालन केले जाईल.


भाजपा कल्याण जिल्हा कला व सांस्कृतिक सेल तर्फे हि स्पर्धा 
 ९ फेब्रुवारी रोजी सायं.७.३० वा.  आचार्य अत्रे रंगमंदिर,कल्याण येथे आयोजित करण्यात आली असून १२ वर्षावरील कोणतीही व्यक्ती यामध्ये सहभागी होऊ शकणार आहे. कल्याण डोंबिवली परिसरातील जास्तीत जास्त शिवप्रेमींनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन कला व सांस्कृतिक सेलचे कल्याण जिल्हा सुधीर भगत यांनी केले आहे. 

कल्याण मध्ये रंगणार भव्य शिवगान स्पर्धा कल्याण मध्ये रंगणार भव्य शिवगान स्पर्धा Reviewed by News1 Marathi on February 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे कारागृहात उभारणार क्रांति कारकांचे स्मारक

■ जिल्हाधिकारी, कारागृह, सार्वजनिक बांधकाम प्रशासना सह आमदार संजय केळकर यांचा पाहणी दौरा... ठाणे , प्रतिनिधी : ऐतिहासिक ठाण्याचे मानबिन्दू अ...

Post AD

home ads