ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र जागृती सभेने जागवले ७८ हजारांहून अधिक हिंदूंमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेचे स्फुल्लिंग
◆धर्मरक्षणाच्या कार्यात मतभेद विसरून हिंदु संघटित झाल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती...
कल्याण , कुणाल म्हात्रे : ‘भारतामध्ये अल्पसंख्यांकांना मिळणारे विशेष प्राधान्य आणि सवलतींमुळे विविध प्रकारचे ‘जिहाद’ डोके वर काढत आहेत. हिंदूंना अत्याचारी इतिहास विसरायला भाग पाडून त्यांना असहिष्णू ठरवले जात आहे. पण या अपप्रचाराला न भुलता सत्य इतिहास शिकवण्यासाठी सरकारकडे आग्रह धरला पाहिजे. सध्या ‘हलाल सर्टिफिकेट’ नावाची एक नवीन समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली असून यातून निर्माण झालेला पैसा भारतात गुन्हे घडविण्यासाठी वापरला जात आहे. यासाठी ‘हलाल’चा शिक्का असणारी उत्पादने खरेदी करू नका. धर्मरक्षणाच्या कार्यात सर्व मतभेद विसरून, संघटित शक्ती दाखवून दिल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त बोलत होते.
सभेच्या आरंभी शंखनाद करण्यात आला. त्यानंतर सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी दीपप्रज्वलन केले. हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर वेदमंत्रपठण झाले. नंतर वक्त्यांची जाज्वल्य भाषणे झाली. ही सभा ‘यु ट्यूब लाइव्ह’ आणि ‘फेसबुक’ यांच्या माध्यमांतून ७८ हजारांहून अधिक लोकांनी पाहिली.
या सभेत बोलतांना श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक म्हणाले की, हिंदु धर्माने कधीही कोणत्याही धर्माला हिणवले नाही. ईश्वर एक आहे; मात्र त्याचे स्वरूप वेगवेगळे आहे अशी शिकवण हिंदु धर्म देतो. अनेक परकीयांनी भारतावर आक्रमण करून हिंदूंवर अनेक अत्याचार केले, संपत्ती लुटली, देवळे उध्वस्त केली, हिंदु संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला कारण हिंदु समाज संघटित नव्हता. हिंदूंनो, पुन्हा अशी स्थिती येऊ नये, यासाठी स्वतःमध्ये धर्मतेज निर्माण करून देव, देश, आणि धर्म यांचे रक्षण करा, असे आवाहनही मुतालिक यांनी केले.
या सभेत धर्मवीरांनी दाखवलेली स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके आणि बालसाधकांनी केलेले धर्मचरणाचे आवाहन लक्षवेधी ठरले. यावेळी धर्मशिक्षणविषयक फ्लेक्स् प्रदर्शनही दाखविण्यात आले. सभेच्या शेवटी हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी, तसेच हिंदूंच्या विविध मागण्यांसाठी ठराव पारित करण्यात आले, याला उपस्थितांनी ‘ऑनलाईन अभिप्राय’ देऊन समर्थन दिले.

Post a Comment