Header AD

पालिकेच्या अ प्रभाग कार्यालयात आढळला दुर्मिळ मांडूळ साप





कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील "अ" प्रभागक्षेत्र कार्यालय परिसरात दुर्मिळ असा मांडूळ साप आढळल्याची घटना गुरुवारी घडली. 


      "अ" प्रभाग क्षेत्र कार्यालय वडवली येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास साप आढळल्याने कर्मचाऱ्यांमध्ये धादंल उडाली. सुमारे चार फुटी लांब साप पाहुन कर्मचारी भाबांवले. प्रसांगावधन राखत कर्मचारी रोशन जाधव यांनी दोन  बाजुस तोंड असलेल्या या मांडुळ सापाच्या प्रजातीस पकडुन सुरक्षित रित्या सर्पमित्र  दत्ता बोंबे यांना काँल करून घटनास्थळी बोलवुन सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्याकडे सुपूर्द केले.                                               


अंधश्रद्धेतून काळी जादु करत पैशांचा पाऊस पाडण्यासाठी मांडूळ सापाचा उपयोग केला जात असल्याने मांडुळ प्रजातीच्या सापाला मागणी असते. बाजारात यांची फार मोठ्या किंमत असल्याने ही प्रजात दुर्मिळ होत चालली आहे. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी  वन खात्याचे एमडी जाधव यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मांडूळ या बिनविषारी सापाला नैसर्गिक अधिवासात सोडले.


पालिकेच्या अ प्रभाग कार्यालयात आढळला दुर्मिळ मांडूळ साप पालिकेच्या अ प्रभाग कार्यालयात आढळला दुर्मिळ मांडूळ साप Reviewed by News1 Marathi on February 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads