Header AD

केडीएमसी तील तीन माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर भाजपाचा दावा

 डोंबिवली , शंकर जाधव   :  कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्तेत वाटेकरी असलेल्या भाजपा पक्षाने विरोधी बाकावर बसून आक्रमकत दाखवली आहे. केडीएमसीत भाजपचे ४२ नगरसेवक असून आगामी निवडणुकीत भाजपने आपला महापौर बसविण्याचा निर्धार घेतला आहे.नुकतेच मनसेचे माजी नगरसेवक तथा माजी विरोधी पक्ष नेते मंदार हळबे यांनी भाजपात प्रवेश केला.त्यामुळे आपल्या पक्षात आयारामची सुरुवात होणार याबद्दलची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. डोंबिवलीत पार पडलेल्या भाजपच्या कार्यक्रमात ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी तीन माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये जल्लोषाचे वातारण पसरले आहेत.


डोंबिवली पुर्वेकडील लोढा हेवन येथे भाजप कल्याण जिल्हा ओबीसी मोर्चा एकदिवसीय पदाधिकारी कार्यकर्त्या मार्गदर्शन शिबीर भरविण्यात आले होते. यावेळी भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी आपल्या भाषणात तीन माजी नगरसेवक भाजपात लवकरच प्रवेश करतील असे जाहीरपणे सांगितले. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या त्या तीन माजी नगरसेवकांची नावे गुप्तच ठेवली.टिळेकर यांनी केलेले  जाहीर विधान उपस्थित कार्यकर्त्यांना उत्साह देणारे होते.तर हे तीन माजी नगरसेवक कोण याचीही उत्सुकता लागली आहे.ह तीन नगरसेवक कोणत्या राजकीय पक्षातील आहे याबाबत चर्चा सुरु झाली आहे. भाजपने यापूर्वी राष्ट्रवादीतून तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 


या तीन नगरसेवकांची त्यांच्या प्रभागात भक्कम स्थान असून भाजपच्या नगरसेवक संख्याबळात वाढ झाली आहे.लवकरच भाजपामध्ये तीन माजी नगरसेवक येणार असल्याने याचा आगामी निवडणुकीत भाजपला नक्कीच सत्ता स्थापन करण्यास मदत होणार आहे.तर आपले तीन नगरसेवक पक्ष सोडणार याची माहिती त्या आता ज्या पक्षात आहेत त्या पक्षाला अद्याप माहिती नसावी अशी चर्चा रंगली आहे. ६० च्या वर नगरसेवक निवडणूक आले तर भाजपचे केडीएमसीवर  कमळ फुलेल.एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजप पूर्वीप्रमाणे इतर पक्षातील पक्के स्थान असलेले नगरसेवक पक्षात असून आपली राजकीय खेळी व्यवस्थित खेळत आहे.भाजपचा हि खेळी अयशस्वी करण्यासाठी इतर राजकीय पक्षांनी आपल्या माजी नगरसेवकांवर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे.      

केडीएमसी तील तीन माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर भाजपाचा दावा केडीएमसी तील तीन माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर भाजपाचा  दावा Reviewed by News1 Marathi on February 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads