Header AD

महिलांना गंडा घालणाऱ्या कॉंग्रेस पदाधिकारी शमीम बानोला पोलिसांनी केली अटक
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : मुद्रा लोन मिळवून देण्याच्या नावाखाली महिलांना गंडा घालणारी काँग्रेसची महिला पदाधिकारी शमीम बानोला  शिवसेनेच्या महिलांनी चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करीत शमीम बानो हिला अटक केली आहे. बानो हिला न्यायालयाने २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्या महिलांना या महिलेने गंडा घातला आहे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करावीअसं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.


        कल्याण पश्चिमेतील तहसील कार्यालयासमोर स्टॅम्प वेंडरचे काम करणारी काँग्रेसची महिला पदाधिकारी शमीम बानो हिला शिवसेनेच्या महिला आघाडीने मंगळवारी संध्याकाळी चोप देत महात्मा फुले पोलिसांच्या हवाली केले होते. शमीम बानो हिने आधी नॅशनल बचत गटाच्या नावाने फी घेतली. त्यानंतर मुद्रा लोन मिळवून देण्याच्या नावाखाली अनेक महिलांकडून लाखो रुपये उकळले. पैसे परत न मिळाल्याने महिलांनी शिवसेनेच्या नेत्यांना संपर्क साधला.


शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक विजया पोटे,  माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडेआशा रसाळ  यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी शमीम बानोला चोप दिला. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नारायण बनकर यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. शमीम बानो हिने फसवणूक केल्याचे उघड झाले असून या प्रकरणी शमीम बानोसह शांती सिंग आणि प्रमोद सिंग या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन शमीमला अटक केली आहे.


या प्रकरणाचा तपास महिला पोलीस अधिकारी वैशाली गुळवे या करीत आहेत. याबाबतीत अजून कोणाला शमीम बानोने फसविले असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार नोंदवावीअसं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 


महिलांना गंडा घालणाऱ्या कॉंग्रेस पदाधिकारी शमीम बानोला पोलिसांनी केली अटक महिलांना गंडा घालणाऱ्या कॉंग्रेस पदाधिकारी शमीम बानोला पोलिसांनी केली अटक Reviewed by News1 Marathi on February 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads