Header AD

रहिवासी भागात धुमाकूळ घातलेल्या माकडाला पकडण्यात यश

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  रहिवासी भागात धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला पकडण्यात वन विभाग आणि वॉर रेस्क्यू फाउंडेशनला यश आले आहे.  


गेल्या अनेक महिन्यांपासून डोंबिवली नजीकच्या खोणी येथील "लेक शोर" कॉम्प्लेक्स मध्ये २ माकडे धुमाकूळ घालत होते. सुरवातीला तेथील नागरिक मुलांच्या हौसेखातर केळी व इतर फळे त्यांना स्वतःहून देत होती. त्यामुळेच त्या माकडांनी तिथेच बस्तान बसवल. नंतर कोरोना काळात अन्न व इतर आहार न मिळाल्याने माकड लोकांच्या घरात येऊन अन्नफळे व इतर खाण्याच्या वस्तू घेऊ लागले.  नागरिकांनी घाबरून वनविभागाच्या हॅलो फॉरेस्ट १९२६ या ट्रोल फी नंबर संपर्क साधून तक्रार केली.  तक्रारची दखल घेऊन कल्याण वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे यांनी वनपाल मच्छिंद्र जाधव व वनरक्षक रोहित भोई यांना घटनास्थळी पाठवले. तसेच वॉर रेस्क्यू फाउंडेशन डोंबिवली टिमचे स्वयंसेवक विशाल कंथारिया यांच्याशी संपर्क साधला.


कल्याण वनविभाग आणि विशाल कंथारिया यांनी प्रथम तेथील लोकांमध्ये जनजागृतीचे काम केले. लोकांना आवाहन केले की त्यांनी माकडांना कोणत्याही प्रकारचे अन्न देऊ नये तसेच सायंकाळी खिडक्या व बाल्कनी बंद ठेवाव्या जेणेकरून माकड तेथून निघून जाईल. परंतू अनेक ठिकाणची झालेली वृक्षतोड व जंगल नाहिसे झाल्यामुळे ती माकडे तिथून जाण्यास तयार नव्हती. शेवटी पर्याय म्हणून कल्याण वनविभागाकडे समन्वय साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तेथे एक माकड ट्रॅप लावण्यात आला.

 स्वतः विशाल आणि वॉर रेस्क्यू टिम याचा पाठपुरावा करत होती. पिंजरा सक्रिय रहावा म्हणून वेळोवेळी त्यातील अन्न व फळे  बदलत होती. तसेच इतर साहित्यांचा वापर करून माकड पकडण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी अथक प्रयत्नांनी आज  ८ फेब्रुवारी  रोजी सकाळी दोन माकडांपैकी  एक माकड त्या पिंजऱ्यात अडकले. लवकरच दुसर्‍या ही माकडाला लवकरच पकडून वनविभागाच्या आदेशान्वये निर्सगमुक्त करणार असल्याचे वॉर संस्थेचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी सांगीतले.


मोहीम यशस्वी होण्यकरीता वॉर रेस्क्यू फाउंडेशनचे जेष्ठ वन्यजीव रक्षक विशाल कंथारियामहेश मोरेप्रेम आहेरस्वप्निल कांबलेविशाल सोनावणेपार्थ पाठारेरेहान मोतिवालाफाल्गुनी दलाल व सुहास पवार तसेच डिला संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र पाटीलतेजस मोरेपंकज वर्मातेजस कवठे यांचे सहकार्य मिळाले.

रहिवासी भागात धुमाकूळ घातलेल्या माकडाला पकडण्यात यश रहिवासी भागात धुमाकूळ घातलेल्या माकडाला पकडण्यात यश Reviewed by News1 Marathi on February 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads