डोंबिवलीत किशोर व कुमार व पुरुष ब गट विभागीय पात्र फेरी कबड्डी स्पर्धा २०२-२१
डोंबिवली ( शंकर जाधव ) येथील पूर्वेकडील नेहरू मैदान येथे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएसन मान्यतेने अश्वमेध स्पोर्ट्स फाउंडेशन संघ डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने ३ री कल्याण –डोंबिवली विभाग किशोर व कुमार व पुरुष ब गट विभागीय पात्र फेरी कबड्डी स्पर्धा २०२-२१ चे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत डॉ.अनिल हेरूर,राहुल दामले,ज्येष्ठ नागरिक सुरेश पुराणिक यांनी उपस्थिती दर्शविली होती.अश्वमेध स्पोर्ट्स फाउंडेशन संघ डोंबिवली मनोज शिंदे यासंह राजू गुजर रविकांत कदम,शंकर भूरसे या स्पर्धेसाठी अथक मेहनत घेतली.स्पर्धेत किशोर गटातील ३२ पैकी ८ पात्र,कुमार गटात ४० पैकी ८ पात्र तर पुरुष ब गटात ३२ पैकी ८ पात्र संघ ठरले आहेत.
जिल्हा निवड चाचणी स्पर्धेसाठी पत्र ठरणार असल्याचे मनोज शिंदे यांनी सांगितले.किशोर गट पात्र संघात हनुमान सेवा मंडळ कल्याण ( अ ),गावदेवी क्रीडा मंडळ चिंचपाडा, श्रीसाई उल्हासनगर,हनुमान वाडी सामाजिक क्रीडा मंडळ कल्याण ( ब ),बॅरिअर्स अॅकॅडमी डोंबिवली, जय शंकर क्रीडा मंडळ,विवेक कल्याणकारी संस्था कल्याण,शिवशंकर क्रीडा मंडळ – कल्याण अशी आठ पात्र संघ आणि कुमार गटात शिव शंकर-कल्याण,बास्को स्पोर्ट्स अॅकॅडमी-कल्याण,छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ – डोंबिवली,हनुमान सेवामंडळ कल्याण ( अ ),वीर मराठा संघ –कल्याण, वाॅरीयर्स अॅकॅडमी- डोंबिवली,विवेक कल्याणकारी संस्था –कल्याण,ओम कबड्डी संघ – कल्याण असे पात्र संघ आहेत.

Post a Comment