Header AD

मनसे पदाधिकाऱयांनी आरपीएफ जवानाची भर रस्त्यात घेतली शाळा

 


■मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसैनिक संतप्त स्कायवॉकवर नागरिकांना लुटणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेने दिला चोप...
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याणच्या स्कायवॉकवर नागरिकांना लुटणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेने चोप दिला असून यादरम्यान मराठीत बोलण्यास नकार देणाऱ्या आरपीएफ जवानाची देखील मनसैनिकांनी भर रस्त्यात चांगलीच शाळा घेतली.  


 कल्याण पश्चिमेतील स्कायवॉक वर तृतीयपंथीय नागरिकांकडून जबरदस्तीने पैसे घेतात ही तक्रार मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे आली होती. काल रात्री मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्टेशन परिसरात यासाठी पोहोचले असता गाडी पार्किंग करतांना तेथील आरपीएफ जवानांनी मनसे पदाधिकारयांना मज्जाव केला. आरपीएफ जवान हिंदीत बोलत असल्याने एका कार्यकर्त्याने त्यांना मराठीत बोलण्यास सांगितले. यावर  जितेंद्र सिंग नावाच्या जवानाने तुम्ही हिंदीत बोला मला मराठी येत नाही असे उत्तर दिले. यामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी त्या आरपीएफ जवानाची भररस्त्यात मराठीची शाळा घेतली. महाराष्ट्रात ड्युटी करता आणि मराठी बोलायला येत नाही. आणि आम्हाला सांगता हिंदीमध्ये बोला हे चालणार नाही असा सज्जड दम दिला.


कल्याण स्टेशनवरील स्कायवॉकवर रात्रीच्या सुमारास नागरिकांची लुबाडणूक करणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेने चांगलीच अद्दल घडवली. कल्याण शहर मनसेने रात्रीच्या सुमारास या स्कायवॉक परिसराला भेट देत तृतीयपंथीयांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.  रात्रीच्या सुमारास कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर तृतीयपंथीयांकडून त्रास होत असल्याच्या तक्रारी कल्याण शहर मनसेला आल्या होत्या. स्कायवॉकवरून जाणाऱ्या लोकांकडून जबरदस्ती पैसे लुबाडणेपैसे दिले नाहीतर घाणेरड्या शिव्या देऊन मारहाण करणे आदी प्रकारच्या तक्रारी होत्या.


या तक्रारींची दखल घेत यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, महिला शहर अध्यक्ष्या शितल विखणकर, विभागअध्यक्ष कपिल पवार, उपविभाग रोहन अक्केवार आदी मनसे कार्यकर्त्यांनी काल रात्री थेट कल्याणच्या स्कायवॉकवर धडक देत तृतीयपंथीयांना चांगलीच अद्दल घडवली. मनसे कार्यकर्त्यांनी संपूर्ण स्कायवॉक पिंजून काढत याठिकाणी असणाऱ्या तृतीयपंथीयांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. मनसे पदाधिकाऱयांनी आरपीएफ जवानाची भर रस्त्यात घेतली शाळा मनसे पदाधिकाऱयांनी आरपीएफ जवानाची भर रस्त्यात घेतली शाळा Reviewed by News1 Marathi on February 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads