Header AD

सतर्क रिक्षा चालका मुळे रिक्षात राहिलेली पर्स महिलेला भेटली

 

◆रिक्षा चालक गणेश पवार यांचे सर्वत्र कौतुक....


ठाणे , प्रतिनिधी  :  ठाण्यातील रिक्षाचालक गणेश पवार यांच्या रिक्षात गांधीनगर माजीवडा ठाणे या ठिकाणाहून एक महिला बसली. तेथून पुढे गावदेवी मंदिर नौपाडा याठिकाणी त्या महिला रिक्षातून खाली उतरल्या दरम्यान त्यांची पर्स रिक्षा मध्येच राहिली. सदर महिला या जोगेश्वरी मुंबई या ठिकाणी राहतात. सतर्क व प्रामाणिक गणेश पवार रिक्षाचालकाने त्यांचे मित्र पोलीस अंमलदार तानाजी पाटील ठाणे शहर यांना ही माहिती दिली. 


त्यानंतर तानाजी पाटील यांनी सदर माहिती पोलीस कंट्रोल ठाणे या ठिकाणी कळवून ट्रॅफिक पोलीस उपनिरीक्षक तावरे यांच्या मदतीने पर्स मध्ये असणाऱ्या कागदपत्रांवरून सदर महिलेचा मोबाईल नंबर मिळवून त्यांची पर्स त्या महिलेस परत करण्यात आली. पर्स मध्ये त्या महिलेची अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे रोख रक्कम देखील होती. यामुळे आपली पर्स रिक्षाचालक आणि पोलिसांच्या मदतीने मिळाल्याने महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुना झाला होता.


रिक्षाचालक गणेश पवार यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक नौपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मांगले यांनी केले.

सतर्क रिक्षा चालका मुळे रिक्षात राहिलेली पर्स महिलेला भेटली सतर्क रिक्षा चालका मुळे रिक्षात राहिलेली पर्स महिलेला भेटली Reviewed by News1 Marathi on February 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads