Header AD

भिवंडीत ओळ्ख पत्रावर चुकीच्या परीक्षा केंद्राचा उल्लेख केल्याने शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित..

भिवंडी : दि.२८ ( प्रतिनिधी )  राज्य शासनाने शिक्षणासंदर्भात कोणतेही धोरण निश्चित न केल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्ग हैराण झाला असतानाच  अनेक ठिकाणी ऑनलाइन परीक्षा व ऑनलाइन शिक्षण सुरू आहे असे असतानाच आरोग्य विभागाच्या आयोजित लेखी परिक्षे दरम्यान ओळ्खपत्रावर चुकीच्या परीक्षा केंद्राचा पत्ता नमूद केल्याने शेकडो विद्यार्थी भिवंडीत परिक्षे पासून वंचित राहिले आहेत . सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित टेलिफोन आँपरेटर व पब्लिक हेल्थ नर्स या पदासाठी लेखी परीक्षा केंद्र भिवंडी शहरात असताना करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेश पत्रावर चुकीचा पत्ता नमूद केल्यामुळे शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसान साठी आरोग्य विभाग बरोबरच गुगल मॅप हा जबाबदार असल्याची मत विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर आपले मत  व्यक्त केले आहे.


 
कोरोनामुळे शाळेमध्ये परीक्षा न घेणे त्याच बरोबर शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही त्यामुळे अनेक शहरात ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. असे असताना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने टेलिफोन आँपरेटर व पब्लिक हेल्थ नर्स या पदासाठी परीक्षा आयोजित केली होती.या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थी बसले होते पुणे नागपूर यवतमाळ बीड सांगली सातारा बुलढाणा,रायगड, मुंबई,हिंगोली अशा विविध मोठ्या शहरातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांचा परीक्षा केंद्र भिवंडीतील शिवाजी चौक येथील चाचा नेहरू हिंदी हायस्कूल मध्ये लागला असल्यामुळे अनेक विद्यार्थी भिवंडीत परीक्षा देण्यासाठी आले, मात्र परीक्षा प्रवेश पत्रावर भिवंडी शहरातील टेमघर रोड असा चुकीचा पत्ता टाकल्यामुळे अनेक विद्यार्थी शहरापासून दूर असलेल्या टेमघर गावात गेले मात्र त्यांना तेथे परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले व सदर पत्ता चुकीचा आहे असे समजले . त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांशी संपर्क करून शहरातील छ. शिवाजी चौक येथे असलेल्या चाचा नेहरू हिंदी हायस्कूल या परीक्षा केंद्रावर धाव घेऊन आपली परीक्षा दिली.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  टेलिफोन आँपरेटर ६०५ पैकी फक्त ४६ विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर उपस्थित असल्याची माहिती शिक्षकांनी दिली. कोरोना अथवा इतर काही कारणांमुळे विद्यार्थी आले नाहीत असे सांगितले. तर विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की परीक्षा प्रवेश पत्रावर चुकीचा पत्ता टाकल्यामुळे आम्हाला प्रवासाचा फार मोठा त्रास सहन करावा लागला रिक्षाचालकांनी मोठ्या प्रमाणात भाडे घेऊन आमची फसवणूक केल्याचे हे विद्यार्थ्यांनी सांगितले प्रवेश पत्रावर सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी चुकीचा पत्ता टाकल्याने आम्हाला फार मोठा त्रास सहन करावा लागला गुगल मॅप वर सुद्धा चुकीचं लोकेशन दाखवण्यात आल्याने आमची ससेहोलपट झाली असे मत त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले पुणे नागपूर भंडारा सांगली यवतमाळ रायगड कल्याण येथून हे विद्यार्थी परीक्षा पेपर देण्यासाठी भिवंडीत आले होते.शासनाने या विद्यार्थ्यांना जवळच्या जिल्ह्या मध्येच परिक्षा केंद्र उपलब्ध करून देणे आवश्यक होते मात्र ते उपलब्ध करून न दिल्यामुळे फार मोठा त्रास सहन करावा लागला अशी माहिती उपस्थित विद्यार्थ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. सकाळी १० ते  दुपारी १२ टेलीफोन ऑपरेटर पदासाठी ६०५ विद्यार्थ्यांपैकी फक्त ४६ विद्यार्थी उपस्थित होते काही विद्यार्थी उशिरा आले तरी त्यांना आम्ही परीक्षेला बसून दिले अशी माहिती शिक्षकांनी दिली. तर दुपारी "पब्लिक हेल्थ नर्स "परीक्षेसाठी ६२४ पैकी ४८ विद्यार्थी हजर होते अनेक विद्यार्थी कोरोना लॉकडाऊन मुळे परीक्षेला आले नाही असा अंदाज सुपरवायझर असलेल्या शिक्षकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर  माहिती दिली.
भिवंडीत ओळ्ख पत्रावर चुकीच्या परीक्षा केंद्राचा उल्लेख केल्याने शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित.. भिवंडीत ओळ्ख पत्रावर चुकीच्या परीक्षा केंद्राचा उल्लेख केल्याने  शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित.. Reviewed by News1 Marathi on February 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads